LockDown ची ऐशीतैशी : रस्त्यावर हजारो लोकांचा जथ्था, पाहा धक्कादायक VIDEO

LockDown ची ऐशीतैशी : रस्त्यावर हजारो लोकांचा जथ्था, पाहा धक्कादायक VIDEO

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

  • Share this:

लखनऊ, 27 मार्च : देशात लॉकडाउन केल्यानंतर तीन दिवस उलटले आहेत. यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. शहरात राहणारे मजूर, कामगार हाताला काहीच काम नसल्यानं गावाकडं निघाले आहेत. पण बस-ट्रेन बंद असल्यानं त्यांच्यावर शेकडो किमी पायी प्रवास करण्याची वेळ आली आहे. दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर असेच हजारो लोक चालत आपल्या गावाकडं जाताना दिसून आले आहेत. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे मजूर चालतच आपल्या घरी पोहोचणार आहेत. पैसे नाहीत, खायला मिळत नाही. कामा धंद्यासाठी शहरात आले पण गावाकडं उपाशीच परतावं लागत आहे. या परिस्थितीत कोरोनाचाही धोका आहे. पोलिस आणि प्रशासनही त्यांना जितकी जमेल तितकी मदत करत आहेत. रस्त्यातच मजुरांसाठी जेवणाची सोयही कऱण्यात आली आहे.

कोरोनापासून वाचण्यासाठी या मजुरांना मास्क दिले जात आहेत. तसंच त्यांना समजावून सांगितलं जात आहे की, तुमचा हा प्रवास धोक्याचा आहे. मजुर म्हणतात की, आम्ही कोरोनापासून वाचू पण भुकेने जीव जाईल. अनेक लोकांच्या पायाला फोड आले आहेत तरीही ते चालत आहेत.

हे वाचा : बापरे! नागरिकांच्या बेफिकीरीमुळे 'या' देशात पुढील सहा महिने चालणार लॉकडाऊन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 21 दिवसांसाठी देशात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर देशातील सर्व दळण वळणाच्या सोयी सुविधा बंद झाल्या. लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार, कामे बंद ठेवण्यात आली आहेत. जगभर पसरलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव भारतातही वेगाने होत आहे. आतापर्यंत भारतात 600 पेक्षा जास्त लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

हे वाचा : असा दिसतो भारतात थैमान घालणारा ‘कोरोना’, पुण्याच्या लॅबमध्ये काढला फोटो

First published: March 27, 2020, 8:38 PM IST

ताज्या बातम्या