Elec-widget

'जेएनयू'पाठोपाठ दिल्ली विद्यापीठातही ABVPला पराभवाचा धक्का !

'जेएनयू'पाठोपाठ दिल्ली विद्यापीठातही ABVPला पराभवाचा धक्का !

'जेएनयू'नंतर आता दिल्ली विद्यापीठातही 'आरएसएस'प्रणित एबीव्हीपी विद्यार्थी संघटनेला पराभवाचा मोठा धक्का बसलाय. राजकीय वर्तुळात उत्सुकतेच्या ठरलेल्या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेनं अनपेक्षित बाजी मारली आहे. काँग्रेसप्रणीत एनएसयुआयनं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशा दोन्ही प्रमुख पदांवर दणदणीत विजय मिळवलाय.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : 'जेएनयू'नंतर आता दिल्ली विद्यापीठातही 'आरएसएस'प्रणित एबीव्हीपी विद्यार्थी संघटनेला पराभवाचा मोठा धक्का बसलाय. राजकीय वर्तुळात उत्सुकतेच्या ठरलेल्या दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) या संघटनेनं अनपेक्षित बाजी मारली आहे. काँग्रेसप्रणीत एनएसयुआयनं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अशा दोन्ही प्रमुख पदांवर दणदणीत विजय मिळवलाय. तर अभाविपला सचिव आणि सहसचिव पदावर समाधान मानावं लागलं आहे.

दिल्ली विद्यापीठात 'एनएसयुआय'नं तब्बल चार वर्षांनंतर पुनरागमन केलं आहे. गेली चार वर्षे दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे होतं. यावेळी मात्र, 'एनएसयुआय'च्या रॉकी तुसीद या विद्यार्थी नेत्याने अध्यक्षपदी माजी मारलीय. त्यानं अभाविपच्या रजत चौधरीचा पराभव केला. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही 'एनएसयुआय'च्याच कुणाल शेरावतने बाजी मारली.

'एनएसयुआय'चा रॉकी तुसीद व अभाविपच्या रजत चौधरी याच्यासह ASAI ची पारल चौहान, अपक्ष उमेदवार राजा चौधरी व अल्का यांच्यात प्रमुख लढत होती. या निवडणुकीत एकूण ४३ टक्के म्हणजेच, सुमारे एक लाख ३२ हजार विद्यार्थ्यांनी मतदान केले होते. एकूण ४० महाविद्यालयांमध्ये ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले होते. विद्यापीठांमधील वैचारिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत मोठी चुरस होती. त्यात एनएसयुआयची सरशी झाली. मागील वर्षी अभाविपनं तीन जागा मिळवत वर्चस्व राखले होते. तर, एनएसयुआयला सहसचिव पदावर विजय मिळाला होता.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्विटरवरून 'एनएसयुआय'च्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलंय. 'एनएसयुआय'चे विजयी उमेदवार सोनिया गांधींचीही त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. दिल्ली विद्यापीठातील या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही बऱ्याच दिवसांनंतर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. राजधानी दिल्लीतील 'विद्यापीठ' निवडणुकांमधले हे लागोपाठचे दोन पराभव 'मोदी आणि शहा कॅम्प'ला नक्कीच विचार करायला लावणारे आहेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 13, 2017 04:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...