नवी दिल्ली, 24 जुलै: कोरोनामुळे दिल्लीतील नागरिक आधीच हैराण आहे त्यामध्ये चोरांनी धुमाकूळ घातला आहे. ग्रेटर केलाश इथे दोन दुचाकीस्वारांनी एका महिलेची चेन खेचल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता दुचाकीवरून जात असलेले दोन तरुण समोरून येणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन मागे बसलेल्या दुचाकीस्वारानं हिसकावली आणि दोघंही तिथून पसार झाले. ही संपूर्ण घटना तिथल्या एक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील चेन खेचण्याचा हा प्रकार घडल्यानं मोठी खळबळ उडाली
#WATCH दिल्ली: ग्रेटर कैलाश में दो बाइक सवारों ने एक महिला की चेन झपटी। घटना CCTV में कैद। पीड़िता ने पुलिस में शिकायत दर्ज़ करवाई। दिल्ली पुलिस ने मामले की जांच शुरू कर दी है। pic.twitter.com/Rl44lSjeUo
सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे तक्रार दाखल केली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा हा प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
आधीच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिक हैराण झाले असताना आता दिल्लीतील ग्रेटर कैलाश परिसरात चोरांचा सुळसुळाट झाल्यानं नागरिक त्रास्त आहेत. नागरिकांनी या चोरांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.