मराठी बातम्या /बातम्या /देश /

स्टार्टअपमध्ये दिल्ली जगाला देणार टक्कर; 5 प्रमुख शहरांमध्ये होणार सहभाग

स्टार्टअपमध्ये दिल्ली जगाला देणार टक्कर; 5 प्रमुख शहरांमध्ये होणार सहभाग

केजरीवाल सरकार यांनी दिल्लीला स्टार्टअप हब करण्यासाठी कंबर कसली आहे

केजरीवाल सरकार यांनी दिल्लीला स्टार्टअप हब करण्यासाठी कंबर कसली आहे

केजरीवाल सरकार यांनी दिल्लीला स्टार्टअप हब करण्यासाठी कंबर कसली आहे

  • Published by:  Meenal Gangurde
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी उद्योग जगतातील यशस्वी आणि तरुण उद्योजकांसोबत नव्या स्टार्टअप नीतीचा मसूदा तयार करण्यासाठी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की नवीन स्टार्टअप नीतीअंतर्गत सरकारचं लक्ष्य दिल्लीला स्टार्टअपसाठी जगातील 5 प्रमुख शहरांपैकी एक बनवणं आहे. याच तयारीने सरकार दिल्लीत स्टार्टअपची योजना अधिक जलद करणार आहे. या कामात सर्वसामान्य लोकांचं मतही घेतलं जाईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकार आपल्या स्टार्टअप नीती तयार करण्यासाठी दोन टप्प्यात चर्चासत्र आयोजित करेल. सर्वात आधी दिल्ली मॉडेलच्या टीमवर्कला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने शनिवारपासून विविध उद्योग क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांना बोलावण्यात आलं होतं. यामध्ये एचसीएलचे सहसंस्थापक अजय चौधरी, सेकोइया कॅपिटलचे एमडी राजन आनंदन, इंडिया एंजल नेटवर्कच्या पद्मजा रुपारेल, श्रीहर्ष मजेटी (सह-संस्थापक आणि सीइओ, स्वीगी), फरीद अहसन (सह-संस्थापक शेअरचॅट) आदी उद्योगपती सहभागी होते. हे वाचा-देशाच्या विकासासाठी मोदींचं पाऊल; आता 'भारत छोडो' अभियान करणार जलद मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना सांगितले की देशातील अन्य राज्यांतील अपेक्षेनुसार दिल्लीत सर्वाधिक स्टार्टअप सक्रीय स्वरुपात काम करीत आहेत. यांचा उद्योग तब्बल 50 बिलियन डॉलर आहे. एका रिपोर्टचा हवाला देत केजरीवाल यांनी सांगितले की दिल्ली 2025 पर्यंत जगातील प्रमुख 5 स्टार्टअप हब होण्याच्या दिशेने चालत आहे.
First published:

Tags: AAP, Startup

पुढील बातम्या