मराठी बातम्या /बातम्या /देश /

दिल्ली पुन्हा हादरली; पोलीस जवानाची गोळी घालून हत्या, एक जखमी

दिल्ली पुन्हा हादरली; पोलीस जवानाची गोळी घालून हत्या, एक जखमी

दिल्ली हिंसाचारात IB अधिकारी अंकित शर्मा यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज गोळीबारात एका जवानाही हत्या झाली

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 16 मार्च : राजधानी दिल्लीच्या (Delhi) द्वारका सेक्टर -23 मध्ये सोमवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका पोलीस जवानाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पोलीस जवानाची हत्या सशस्त्र गुन्हेगारांनी केली आहे. या अपघातात होमगार्डचा जवानही जखमी झाला आहे. पोलिसांनी (Delhi Police) या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

14 मार्च रोजी शनिवारी दुपारी दिल्लीच्या रोहिणी भागात पोलीस आणि दरोडेखोरांच्या चकमकीत एक सैनिक जखमी झाला. या चकमकीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने एका आरोपीला अटक केली. त्याचवेळी दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात एक पोलीस जवानही जखमी झाला आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे रोहिणीमध्ये काही शार्प शूटर्स असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर या उपद्रव्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी  सापळा रचला. जशी बदमाशांची गाडी तेथे येऊन थांबली पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी गोळीबार सुरू केला.

हे वाचा -  राहुल गांधींनी कर्जबुडव्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरुन लोकसभेत गदारोळ

एक जवान जखमी

पोलिसांनी या प्रकरणात एका बदमाशाला ताब्यात घेतले आहे. यादरम्यान एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप या गोळीबाराबाबत सविस्तर माहिती हाती आलेली नसून गोळीबार करणाऱ्यांचा कोणत्या गँगशी संबंध होता का? यासंदर्भातही तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

First published: