नर्सरीचे अॅडमिशन यावर्षी रद्द? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्याचा मोठा निर्णय

जुलैपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. त्यामुळं नर्सरीचे अ‍ॅडमिशन (Nursery Admission) होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबरच शाळा सुरू झाल्यादेखील तरीही लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे.

जुलैपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. त्यामुळं नर्सरीचे अ‍ॅडमिशन (Nursery Admission) होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबरच शाळा सुरू झाल्यादेखील तरीही लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 24 डिसेंबर : कोरोनाच्या (covid 19) संकटाचा विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला असून काही महिन्यांपासून शाळा ऑनलाईन सुरु आहेत. कोरोना रुग्णांची संख्या दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचं हे वर्ष ऑनलाईन शिक्षणातच जाणार आहे. लस बाजारात कधी येणार आहे याची देखील अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळं जुलै अगोदर शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्याचं दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodiya) यांनी म्हटलं होतं. त्यामुळं आता पुन्हा एकदा दिल्ली सरकार नवीन निर्णय घेण्याच्या तयारीत असून यावर्षी दिल्लीमध्ये नर्सरी अ‍ॅडमिशन (Nursery Admission) रद्द होण्याची शक्यता आहे. दिल्ली सरकार यावर विचार करत असून लवकरच खासगी शाळांना देखील हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यावर्षी जुलैपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत. त्यामुळं नर्सरीचे अ‍ॅडमिशन (Nursery Admission) होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबरच शाळा सुरू झाल्यादेखील तरीही लहान मुलांना सर्वात शेवटी शाळेत बोलावले जाणार आहे. त्यामुळं यावर्षी त्यांना घरी बसून ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागणार आहे. म्हणून अ‍ॅडमिशन न करण्याचा पर्याय विचारात असून सरकारने यासंदर्भात तयारी सुरू केली आहे. या विषयी बोलताना सिसोदिया यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना संकटात न टाकता शाळा सुरु करणे आणि परीक्षा घेणे हे आमचे लक्ष्य असल्याचे म्हटले. कोरोनाची लस फेब्रुवारीमध्ये जरी बाजारात आली तरीही जुलैपर्यंत सर्वांना लसीकरण करणे शक्य नाही. त्यामुळे यावर्षी शाळा सुरु होण्याची शक्यता नसल्यानं नर्सरीचे अ‍ॅडमिशन रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. हे वाचा- धक्कादायक! ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता दरम्यान, दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत असून मंगळवारी दिल्लीमध्ये 803 रुग्ण आढळून आले आहेत. परंतु यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागील चार महिन्यांत पहिल्यांदा हा आकडा हजाराच्या खाली आला आहे. त्याचबरोबर पॉजिटिव्हिटी रेट देखील कमी झाला आहे. 1.29% टक्के पॉजिटिव्हिटी रेट आढळून आला असून मागील 10 ते 12 दिवसांत 2 टक्क्याच्या देखील खालीच हा रेट राहिला आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांमध्ये ही आकडेवारी कशी राहते यावर सर्व गणिते अवलंबून आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: