जिथे मुस्लिमांना जागा नाही, ते हिंदुत्वच नाही -मोहन भागवत

जिथे मुस्लिमांना जागा नाही, ते हिंदुत्वच नाही -मोहन भागवत

  • Share this:

नवी दिल्ली,18 सप्टेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज अल्पसंख्यकांची मन जिंकण्याचा प्रयत्न केलाय. 'हिंदू राष्ट्रामध्ये मुस्लिमांना जागा नाही, तर ते हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही' असं वक्तव्य केलं. तसंच त्यांनी संघ नेहमी राज्य घटनेवर पूर्णविश्वास ठेवतो असंही त्यांनी सांगितलं.

नवी दिल्लीत विज्ञान भवनात संघाची तीन दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलीये. 'भविष्यातील भारत' संवादात आज दुसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी उपस्थितांशी संवाद साधला. एक हिंदू राष्ट्र तयार होणे म्हणजे यात मुस्लिमांना जागा नसणे असं बिल्कुल नाही. ज्या दिवशी असे होईल त्या दिवशी हिंदुत्व राहणार नाही. हिंदुत्व पूर्ण जगाला आपलं कुटुंब मानण्याचा विचार करतो असं भागवत यांनी सांगितलं.

मोहन भागवत यांनी असंही म्हटलंय की, आपल्या स्वयंसेवकांनी कधी कोणत्याही पक्षाचे काम करण्यास सांगितलं नाही, उलट राष्ट्राच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकांना समर्थन देण्याचा सल्ला दिलाय असंही ते म्हणाले.

तसंच संघटनेत अनेक कार्यकर्ते आहे. संघ नेहमी राजकारणापासून दूर राहिलाय, पण राष्ट्राच्या हिताचा मुद्द्यावर आमचा दृष्टिकोण आहे असंही ते म्हणाले.

संघ नेहमी राज्य घटनेचा आदर करतो. राज्य घटनेनुसार सत्तेचं केंद्र असलं पाहिजे जर असं झालं नाही तर चुकीचं आहे असंही भागवत म्हणाले.

'भविष्य का भारत, आरएसएस का दृष्टिकोन' या नावाने हे संमेलन सुरू आहे. पहिल्या दिवशी मोहन भागवत यांनी कोणता पक्ष सत्तेत असावा याचा संघ कधी विचार करत नाही असं सांगितलंय. या संमेलनातून भागवत यांनी संघाच्या विचारधारेवरून निर्माण झालेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केलाय.

==========================================

VIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार

First published: September 18, 2018, 9:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading