नवी दिल्ली, 25 जानेवारी : दिल्लीतील भजनपुरा भागाता एका कोचिंग सेंटरच्या इमारतीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. तसेच कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱे 13 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्यावेळी कोचिंग सेंटरचे छत कोसळले त्यावेळी अनेक विद्यार्थी त्याठिकाणी उपस्थित होते. या दुर्घटनेत 13 विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. छत कोसळल्यानंतर इथं एकच गोंधळ उडाला. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. तसेच छताच्या ढिगाऱ्याखाली काही विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
#UPDATE: 13 persons have been shifted to hospital and 3 students are missing. Rescue operations underway. #Delhi pic.twitter.com/ZhI1KnizEu
— ANI (@ANI) January 25, 2020
बचावपथकातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, इमारतीमध्ये कोचिंग सेंटर सुरू होते. या ढिगाऱ्याखाली काही विद्यार्थी अडकल्याची शक्यता आहे. साडेचार वाजता या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच इंटरनेट सुरू, माजी मुख्यमंत्र्यांचा PHOTO VIRAL
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi