...त्या रात्री अर्धनग्नावस्थेत पोहोचली पीडित तरुणी, पण मदतीऐवजी पोलिसांनी लावलं पळवून

...त्या रात्री अर्धनग्नावस्थेत पोहोचली पीडित तरुणी, पण मदतीऐवजी पोलिसांनी लावलं पळवून

संतापजनक बाब म्हणजे पीडित तरुणी अर्धनग्न अवस्थेतच एका पोलीस अधिकाऱ्याकडून दुसऱ्या पोलिसाकडे मदतीसाठी धावा करत होती. पण या पोलिसांनी तिच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याची लज्जास्पद बाब समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : गंभीर बलात्कार प्रकरण हाताळण्यात पोलिसांनी अतिशय बेजबाबदारपणा दाखवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बलात्कार झाल्यानंतर तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेलेल्या पीडित तरुणीला मदत करण्याऐवजी पळवून लावण्यात आल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पोलिसी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे. संतापजनक बाब म्हणजे पीडित तरुणी अर्धनग्न अवस्थेतच एका पोलीस अधिकाऱ्याकडून दुसऱ्या पोलिसाकडे मदतीसाठी धावा करत होती. पण या पोलिसांनी तिच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याची लज्जास्पद बाब समोर आली आहे. इतकंच नाही तर या पीडितेला पोलीस ठाण्यातून पळवण्याचं कामही दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केलं. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत ही घटना घडली आहे.

(वाचा :'तु खरंच लायक आहेस का?' वादग्रस्त ट्वीटवरून आतिफ असलमला नेटकऱ्यांनी झापलं)

सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंतच तक्रार नोंदवली जाते - पोलीस

या विद्यार्थिनीनं पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर पीडितेनं ड्युटी ऑफिसरकडे आपबीती सांगत तक्रार नोंदवण्यास विनंती केली. पण अधिकाऱ्यानं तिचं काहीही ऐकलं नाही. यानंतर जवळपास तासभर ही पीडित अर्धनग्न अवस्थेतच पोलीस स्टेशनमध्ये न्यायासाठी चकरा मारत होती. पण या गंभीर विषयात पोलिसांचा अतिशय हलगर्जीपणा पाहायला मिळाला.

(वाचा : 'सॉरी आईबाबा, मी चांगला मुलगा होऊ शकलो नाही', तणावातून मुलाची आत्महत्या)

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात न्याय मागण्यासाठी पीडित वसंत कुंज पोलीस ठाण्यात गेली होती. येथे अंजना आणि सुमन नावाच्या दोन महिलांसोबत तिची बातचित झाली. पण या दोघींनीही तिची तक्रार नोंदवण्यासाठी मदत करणं तर सोडा साधं तिला जेएनयूपर्यंत पोहोचवण्यासही स्पष्ट नकार दिला. याप्रकरणी संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, अत्याचाराची घटना आणि पोलिसांचं वर्तन यामुळे पीडित तरुणीला प्रचंड धक्का बसला आहे.

कोल्हापुरात पूरस्थिती अतीगंभीर होण्याची चिन्हं, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 10:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading