जामिया मीलीयाच्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रियंका गांधी आल्या रस्त्यावर

जामिया मीलीयाच्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रियंका गांधी आल्या रस्त्यावर

या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं असून काँग्रेस आणि भाजपमधला हा संघर्ष चिघळणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 16 डिसेंबर : दिल्लीतल्या जामिया मीलीया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली त्याचे पडसाद आता उमटत आहेत. या कारवाईमुळे देशभर वादळ निर्माण झालंय. कारवाईची तीव्र विरोध करण्यात येतोय. या कारवाईच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी आता थेट मैदानात उतरल्या असून त्यांनी राजपथावरच्या इंडिया गेटसमोर बैठक मारत धरणं धरलं. प्रियंका गांधी आणि काही काँग्रेस नेते इंडिया गेट जवळ आले आणि त्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अत्याचार केला असून दोषींना शिक्षा व्हावी अशी मागणी प्रियंका गांधी यांनी केलीय. प्रियंका गांधी यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्तेही इंडिया गेटजवळ जमा झाले. या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं असून काँग्रेस आणि भाजप विरुद्धचा संघर्ष चिघळणार आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार दोषी

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून Citizenship Amendment Act (CAA) देशभर हिंसाचार सुरू आहे. पूर्वोत्तरेतल्या राज्यांनंतर आता हे लोन दिल्लीतही आलं असून विद्यार्थ्यांचा भडका उडालाय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलंय. रविवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. CAAमुळे कुठल्याही धर्माच्या भारतीयांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. या नव्या कायद्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या लोकांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वीकारणं ही आपल्या प्राचीन परंपरेची शिकवण आहे. त्याचाच अवलंब करण्यात आला आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा आणि चुकीचं माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी आज एकापाठोपाठ चार ट्वीट करत सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सगळं काही स्पष्ट असताना सरकार काही लोक जाणीवपूर्वक समाजात आणि देशात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. देशातल्या बहुतांश पक्ष आणि खासदारांनी या कायद्याचं समर्थन केलंय. त्यामुळे कुठल्याही अफवांना आणि खोट्या माहितीला बळी पडू नका आणि शांततेच्या मार्गानेच आंदोन करा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलंय.

सुप्रीम कोर्टाने फटकारलं

जामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायायलयात तात्काळ सुनावणीची मागणी करण्यात आली होती. वकील इंदिला जयसिंग यांनी देशात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी करू असं म्हटलं पण आधी हिंसाचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीशांनी म्हटले की, शांततेनं विरोध करणाऱ्यांविरुद्ध आम्ही नाही आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी आमची जबाबदारी माहिती आहे.

First Published: Dec 16, 2019 04:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading