मराठी बातम्या /बातम्या /देश /

BREAKING : ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर छापा, टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई

BREAKING : ट्विटर इंडियाच्या ऑफिसवर छापा, टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई

कोरोना व्हायरसमध्ये आलेल्या टूलकिटचा वाद (Toolkit Controversy) वाढतच चालला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांच्या ट्वीटला मॅन्युपुलेटेड मीडिया सांगणाऱ्या ट्विटर इंडियाच्या (Twitter India) ऑफिसवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) धाड टाकली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 24 मे : कोरोना व्हायरसमध्ये आलेल्या टूलकिटचा वाद (Toolkit Controversy) वाढतच चालला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांच्या ट्वीटला मॅन्युपुलेटेड मीडिया सांगणाऱ्या ट्विटर इंडियाच्या (Twitter India) ऑफिसवर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) धाड टाकली आहे. ट्विटरच्या लाडू सराई आणि गुरुग्रामच्या ऑफिसवर या धाडी टाकण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. संबित पात्रा यांचं ट्वीट मॅन्युपुलेटेड असल्याचं सांगितल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ट्विटरला नोटीस पाठवली आणि याबाबतचा पुरावा द्यायला सांगितलं, यावर ट्विटरने मात्र आपण ही माहिती द्यायला बांधील नसल्याची प्रतिक्रिया दिली. ट्विटरकडून हे उत्तर मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्या दोन कार्यालयांवर धाडी टाकल्या.

लाडो सरायमध्ये दिल्ली पोलिसांची टीम जवळपास एक तास थांबली. स्पेशल सेलने ट्विटक इंडियाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा ऑफिसचा दरवाजा उघडण्यात आला नाही, तेव्हा टीमला परतावं लागलं.

काय आहे वाद?

18 मे रोजी भाजपचे मुख्य प्रवक्ते संबित पात्रा आणि भाजप महासचिव बीएल संतोष यांनी चार-चार पेजचं दोन वेगवेगळे स्क्रीनशॉट ट्वीट केले. यामध्ये एक स्क्रीनशॉट कोरोना आणि दुसरा सेन्ट्रल विस्टा प्रोजेक्टबाबत होता. हे टूलकिट काँग्रेसचं असल्याचा दावा या दोघांनी केला होता. तसंच कोरोनाच्या काळात मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी हे टूलकीट तयार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी ट्वीटमध्ये केला.

संबित पात्रा यांनी आरोप केला की या टूलकीटमध्ये काँग्रेसने कार्यकर्त्यांना मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी 'सुपर स्प्रेडर कुंभ', व्हायरसच्या म्युटन्टला 'मोदी स्ट्रेन' यांच्यासारख्या शब्दांचा वापर करायला सांगितला.

संबित पात्रा यांच्या या ट्वीटला नंतर ट्विटरने मॅन्युपुलेटेड मीडिया सांगितलं. ट्विटरच्या या भूमिकेवर केंद्र सरकारनेही नाराजी व्यक्त केली. सूचना प्रसारण मंत्रालयाने या ट्वीटवरून मॅन्युपुलेटेड मीडिया हा टॅग हटवायला सांगितलं, कारण याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. ट्विटरने हे पाऊल उचलल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपविरोधात तुघलकरोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, यानंतर दिल्ली पोलीस स्पेशल सेलला ही केस ट्रान्सफर करण्यात आली.

सोमवारी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ट्विटर इंडियाला नोटीस दिली. या नोटीसमध्ये ट्विटर इंडियाकडे संबित पात्रा यांचं ट्विट मॅन्युपुलेटेड असल्याचे काय पुरावे आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. यानंतर ट्विटर इंडियाने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला उत्तर देत आम्ही माहिती द्यायला बांधील नसल्याची प्रतिक्रिया दिली. यानंतर दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या ऑफिसमध्ये धाडी टाकल्या.

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. नियमीत प्रक्रिया म्हणून आम्ही ट्विटरच्या ऑफिसमध्ये नोटीस द्यायला गेलो होतो. हे आवश्यक होतं, कारण योग्य व्यक्ती कोण आहे, याची आम्हाला माहिती हवी होती, कारण ट्विटर इंडियाच्या एमडीनी दिलेलं उत्तर अस्पष्ट आहे, असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सांगितलं.

First published:

Tags: Delhi, Delhi Police, Twitter