जामिया आंदोलकांबाबत दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा!

जामिया आंदोलकांबाबत दिल्ली पोलिसांचा धक्कादायक खुलासा!

जामिया मिलिया इस्लामिया प्रकरणी याचिकांवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून संबंधितांना उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 डिसेंबर : जामिया विद्यापीठात पोलिस आणि विद्यार्थी यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीनंतर आता दिल्ली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. जामिया मिलिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्यासाठी सुरु केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यात काही विद्यार्थी जखमी झाले होते. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी दहा जणांना अटक केली असून यात एकही विद्यार्थी नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, दिल्लीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त कुमार ज्ञानेश यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. आंदोलक पुर्वतयारी करून आंदोलनात उतरले होते. त्यांच्याकडे भिजलेली ब्लँकेट होती. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडताच त्यावर टाकण्यासाठी त्यांचा वापर आंदोलकांनी केला. आंदोलन शांततेनं होतं तर मग ब्लँकेट भिजवून कसं काय आणलं याचा तपास केला जात आहे. हे नक्कीच उत्स्फुर्तपणे नव्हतं तर सर्वकाही पुर्वनियोजित होतं असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया प्रकरणी याचिकांवर सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून संबंधितांना उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी याचिकेवर सुनावणी झाली यावेळी सरन्यायाधीस एस एस बोबडे यांच्या पीठाने याचिकाकर्त्यांना विचारले की, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात का आलात उच्च न्यायालयात का गेला नाहीत?

जामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायायलयात तात्काळ सुनावणीची मागणी करण्यात आली होती. वकील इंदिला जयसिंग यांनी देशात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी करू असं म्हटलं पण आधी हिंसाचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीशांनी म्हटले की, शांततेनं विरोध करणाऱ्यांविरुद्ध आम्ही नाही आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी आमची जबाबदारी माहिती आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून Citizenship Amendment Act (CAA) देशभर हिंसाचार सुरू आहे. पूर्वोत्तरेतल्या राज्यांनंतर आता हे लोन दिल्लीतही आलं असून विद्यार्थ्यांचा भडका उडालाय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडलंय. रविवारी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्वांना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. CAAमुळे कुठल्याही धर्माच्या भारतीयांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. या नव्या कायद्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या लोकांना आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वीकारणं ही आपल्या प्राचीन परंपरेची शिकवण आहे. त्याचाच अवलंब करण्यात आला आहे. काही लोक जाणीवपूर्वक अफवा आणि चुकीचं माहिती पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

Published by: Suraj Yadav
First published: December 17, 2019, 1:59 PM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading