नवी दिल्ली, 17 एप्रिल : सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) परिस्थिती अत्यंत गंभीर बनत चालली आहे. या काळामध्ये पोलीस दिवस रात्र एक करून रस्त्यावर उतरले आहेत. सामान्यांना घरात राहण्याचे आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे तर काही ठिकाणी पोलीस स्वत:चे पैसे खर्च करून भुकेलेल्यांना अन्न देत आहेत. मात्र राजधानी दिल्लीतून अशी घटना समोर येत आहे की दोन पोलिसांनी एका आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे प्राण वाचवले आहेत. कोरोनाच्या संकटात कर्तव्य बजावत असताना पोलिसांना अशा घटनांना देखील सामोरे जावे लागत आहेत. दिल्लीतील मंगोलपुरी परिसरात ही घटना घडली.
(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये माजी पंतप्रधानांचा नातू बोहल्यावर, सरकारकडून चौकशी सुरू)
या तरूणाला पत्नी आणि एक मुलगा आहे. बेरोजगारीमुळे त्याचे बायकोबरोबर अनेकदा खटके उडत असल्याची माहिती समोर येत आहे. आणि त्यातूनच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र या दोन पोलिसांनी देवदूत बनून त्याचे प्राण वाचवले आहेत. या तरुण परिसरातील एका फ्लायओव्हरवरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी फ्लायओव्हरवर लटकल्याचं पाहताच त्यांनी त्याला हात दिला आणि वर खेचले. दरम्यान तो युवक पोलिसांना त्याचे प्राण वाचवण्यापासून रोखत होता. तरीही त्यांनी त्याला वर खेचलं. एवढच नव्हे तर तो खाली पडला तर त्याला कोणतीही इजा होऊ नये याकरता पोलिसांनी कचऱ्याचा ट्रक तिथे लावला. जेणेकरून त्याला कोणतीही दुखापत होणार नाही.
(हे वाचा-भारताला सगळ्यात मोठं यश, 24 तासांत 260 रुग्णांनी कोरोनावर केली मात)
गुरूवारी रात्री 10.30 च्या सुमारास वेस्ट एन्क्लेव्हजवळ आउटर रिंग रोड फ्लायओव्हरवरून आत्महत्येचा प्रयत्न करत होता. हा 30 वर्षाचा तरूण परिसरातील टिळक नगरमध्ये राहणारा होता. यावेळी मंगोलपुरी पोलीस ठाण्यात ड्युटीवर असणारे कॉन्स्टेबल धीरज आणि कॉन्स्टेबल जयप्रकाश त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाचे प्राण वाचवले आहेत
Published by:Janhavi Bhatkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.