Home /News /national /

ISIसाठी काम करणाऱ्याला अटक; BSF आणि भारतीय सैन्याशी संबंधित कागदपत्रे, नकाशा जप्त

ISIसाठी काम करणाऱ्याला अटक; BSF आणि भारतीय सैन्याशी संबंधित कागदपत्रे, नकाशा जप्त

बीएसएफ आणि सैन्य दलाच्या संबंधितील कागदपत्रांसह एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

    दिल्ली, 17 एप्रिल: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police special cell) पाकिस्तानी गुप्तच संस्था आयएसआय (ISI)साठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव हरपाल सिंग (Harpal Singh) असे असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी हरपाल सिंग हा भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) आंतरराष्ट्रीय सीमेवरुन आयएसआयसाठी काम करत होता. आरोपी हरपाल हा पंजाबमधील तरनतारन (Tarantaran, Punjab) परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकाने हरपाल सिंग याला दिल्लीत अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी बीएसएफ (BSF) आणि भारतीय सैन्याच्या (Indian Army) संबंधित महत्वाचे कागदपत्रे तसेच नकाशा जप्त केला आहे. सूत्रांच्या मते, आरोपी हरपाल सिंग हा दिल्लीत एका खास मिशनसाठी आला होता. दिल्लीत येऊन हरपाल सिंग हा आयएसआयसाठी काम करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला बीएसएफ, भारतीय सैन्याच्या संबंधातील महत्वाचे कागदपत्रे तसेच नकाशा सोपवणार होता. वाचा: अमेरिकेत FedEx सेंटरवर गोळीबार; 4 शीख बांधवांसह 8 जणांचा मृत्यू, हल्लेखोरानं स्वतःवरही झाडली गोळी असे सांगितले जात आहे की, आरोपी हरपाल सिंग अनेक एजन्सीच्या रडारवर होता. आरोपीला OSA म्हणजेच ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट अंतर्गत अटक करण्यात आली आहे. हरपाल सिंग याच्याकडून भारत-पाकिस्तान सीमेचा नकाशा, लष्कर आणि दिल्लीत असलेल्या बीएसएफ मुख्यालयाचे फोटोज आणि कँट क्षेत्रातील फोटो जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हरपाल सिंग आयएसआयसाठी पे रोलवर म्हणजेच वेतनावर काम करत असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. हवालामार्फत आयएसआय हरपाल सिंग याला पैशांचा पुरवठा करत असल्याचीही माहिती समोर आली आहे.
    First published:

    Tags: Delhi Police, Indian army

    पुढील बातम्या