ISISशी संबंधित पती-पत्नीला दिल्लीत अटक, आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत होतं दाम्पत्य

ISISशी संबंधित पती-पत्नीला दिल्लीत अटक, आत्मघातकी हल्ल्याच्या तयारीत होतं दाम्पत्य

जहानजेब सामी आणि हिन्दा बशीर बेग अशी दोघांची नावे असून दोघे दिल्ली आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली,8 मार्च: दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या जहाल दहशतवादी संघटनेचे खुरासान मॉड्युलशी संबंधित दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ओखला परिसरातून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दोन्ही पती-पत्नी असल्याचं सांगितलं जात आहे. जहानजेब सामी आणि हिन्दा बशीर बेग अशी दोघांची नावे असून दोघे दिल्ली आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी दोघांकडून संवेदनशील साहित्यही जप्त केलं आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोन्ही पती-पत्नी असून 'इंडियन मुस्लिम यूनाइट' नावाने एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवत होते. CAA, NRC विरोधी आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्याचा त्यांचा हेतू होता. अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचा इस्लामिक स्टेट इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संगटनेशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही ऑगस्ट-2019 पासून दिल्लीत राहत आहे. दाम्तत्याकडे आक्षेपार्ह दस्ताऐवज देखील आढळून आले आहेत. जहानजेब सामी हा दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करत होता. पोलिस दोघांची कसून चौकशी करत आहे.

ISKP अर्थात खुरासान मॉड्युल हा इस्लामिक स्टेटचा एक भाग आहे. CAA, NRC विरोधी आंदोलनात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करुन घेण्याचा या दहशतवाद्यांचा हेतू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिल्लीतील जामिया नगरात ओखला विहारमध्ये हे दाम्पत्य वर्षभरापासून राहत होतं. अटक केल्यानंतर दोघांना स्पेशल सेलच्या कार्यालयात नेण्यात आलं असून IB चे अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहेत.

राजधानी दिल्लीत CAA विरोधात जो हिंसाचार उफाळला होता. त्याबाबत आता अनेक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आले असतानाच हा हिंसाचार उफाळला होता. त्यात 50 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचाराला ज्यांनी चिथावणी दिली त्यांना पाकिस्तानातून पैसा मिळाला होता, अशी माहिती गुप्तचर सूत्रांना मिळाली आहे. यासंदर्भात काही पुरावे भारतीय संस्थांना मिळाले असून ते त्यांनी मानवाधिकार परिषदेत सादर केले आहेत. जिनिव्हि इथं संयुक्त राष्ट्राची मानवाधिकार परिषद सुरू आहे. त्यात भारताने हे पुरावे सादर केले आहेत, असं वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिलं आहे.

दरम्यान, या आधीही अशा शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. भारतीय गुप्तचर संस्थांनी पाकिस्तानातून भारतात केले जाणारे काही फोन टेप केले आहेत. त्यात हँडलर्स हे भारतातल्या हस्तकांना काही आदेश देत असल्याचं स्पष्ट झालं आहे. दिल्लीत हिंसाचार भडकून जगभर भारताची बदनामी व्हावी, यासाठी पाकिस्तान पूर्ण प्रयत्न करतो. 2002 च्या गुजरात दंगलीच्या वेळीही पाकिस्तानने असेच केले होते. सीएए आणि त्याविरोधातलं आंदोलन हे पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात कुणीही दखल देऊ नये असं भारताने ठामपणे म्हटलं आहे.

हेही वाचा...

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत हस्तांदोलन करणारा निघाला ‘कोरोना’चा रुग्ण

खळबळजनक : CAA विरोधी दिल्लीतल्या हिंसाचारासाठी पाकिस्तानातून पैसा?

First published: March 8, 2020, 5:02 PM IST

ताज्या बातम्या