Home /News /national /

हनी ट्रॅपमध्ये अडकला भारतीय हवाई दलाचा जवान, पाकिस्तानच्या ISIने अडकवल्याचा संशय, हेरगिरीच्या आरोपाखाली जवानाला दिल्ली पोलिसांकडून अटक

हनी ट्रॅपमध्ये अडकला भारतीय हवाई दलाचा जवान, पाकिस्तानच्या ISIने अडकवल्याचा संशय, हेरगिरीच्या आरोपाखाली जवानाला दिल्ली पोलिसांकडून अटक

भारतीय वायू दलातील एका जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून गुप्त आणि संवेदनशील माहिती शत्रूंनी मिळवल्याची माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 12 मे : दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्राँचने (Delhi Police Crime Brance) हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय वायू दलाच्या एका जवानाला अटक (IAF Jawan arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव देवेंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयया याच्या पाठीमागे हात असल्याचा संशय दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्राँचने वर्तवला आहे. भारतीय वायू दलाचा जवान देवेंद्रला हनी ट्रॅपमध्ये (IAF Jawan trapped in honey trap) अडकवून त्याच्याकडून भारतीय हवाई दलाच्या संदर्भातील संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या आयएसआयने मिळवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हवाई दलाच्या जवानाला हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या तपासात संबंधित जवानाच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळून आल्याचंही समोर आलं आहे. कानपूर येथील निवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला जवान देवेंद्र हा कानपूर येथील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्राँचच्या मते, जवान देवेंद्र याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून वायूसेनेच्या संदर्भातील संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वाचा : बॉयफ्रेंडच्या भावाला वाचवण्यासाठी गर्लफ्रेंडचा खटाटोप, पिंपरीत तोतया महिला पोलिसाला अटक पोलिसांच्या मते, देवेंद्र याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता की, वायूसेनेचे किती रडार तैनात आहेत. यासोबतच वायूसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे, त्यांचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. या संदर्भात गुप्त माहिती मिळाल्यावर दिल्ली क्राईम ब्राँचने आरोपी देवेंद्र याला 6 मे रोजी अटक केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र याला धौला कुआं येथून अटक करण्यात आली आहे. देवेंद्र हा कानपूर येथील निवासी असल्याचं बोललं जात आहे. असं म्हटलं जात आहे की, एका महिलेसोबत सोशल मीडियावर त्याची मैत्री झाली होती. त्यानंतर तो या महिलेसोबत फोनवर अश्लील चॅट करत असे आणि त्याच दरम्यान तो हनी ट्रॅपमध्ये अडकला. हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर त्याच्याकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Delhi, India, Pakistan

    पुढील बातम्या