News18 Lokmat

मोठं यश; जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अटकेत

दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 11:34 AM IST

मोठं यश; जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी अटकेत

श्रीनगर, 01 एप्रिल : दिल्ली पोलीस आणि जम्मू - काश्मीर स्पेशल सेलनं मोठी कारवाई करत दहशतवाद्याला जिंवत पकडलं आहे. अटक केलेला दहशतवादी हा जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा असून फैयाज अहमद लोन असं या दहशतवादाचं नाव आहे. त्याच्यावर 2 लाखांचं इनाम देखील दिल्ली पोलिसांनी जाहीर केलं होतं. तसेच अजामीनपात्र गुन्हा देखील त्याच्या विरोधात दाखल करण्यात आला होता. 2015पासून फैयाज अहमद लोनच्या शोधात सुरक्षा यंत्रणा होत्या. पण, आता त्याला अटक केल्यानं सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. दिल्ली पोलिस आणि जम्मू - काश्मीर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.



Loading...


कोण आहे फैयाज अहमद लोन?

2007मध्ये दिल्लीतील डीडीयू मार्ग येथे स्पेशल सेल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्यावेळी पाकिस्तानी नागरिक आणि 3 काश्मीरी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. 2007मध्ये न्यायालयानं सर्वानं सोडून दिलं होतं. पण, 2015मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून फैयाज अहमद लोन फरार होता.त्याला आता अटक करण्यात आली आहे. तर, अद्याप दोघांचा शोध सुरू आहे.


दुचाकीवरून येणाऱ्या मित्रांवर अंधाधुंद गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू


दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत भारतीय लष्कराचे 3 जवान आणि एक पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवासांपासून भारतीय लष्कराने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे.

पुलवामा जिल्ह्यातील लासीपुरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती कळताच भारतीय सुरक्षा दलाने या भागात सर्च ऑपरेशन सुरु केले. तेव्हा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्यात चकमक झाली. चकमकीच्या ठिकाणाहून दोन एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तुल सापडली आहे. चकमक झाल्यानंतर भारतीय लष्कराने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्याने सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

खात्मा करण्यात आलेले सर्व दहशतवादी लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला असून दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलातील जवानही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


VIDEO: RSSचा मुस्लीम राष्ट्रीय मंच पाठिंबा देणार; नाना पटोलेंचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...