नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: आज दिल्लीसोबतच देशभरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजचा दिवस महत्त्वाचा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज बजेटवर चर्चे आणि आलेल्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. पण त्या व्यतिरिक्त सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगल्या आहेत. एकीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने मुसंडी मारली आहे. तिथे मतमोजणीची धामधुम सुरू असतानाच राज्यसभा आणि लोकसभेत आज भाजपकडून संसदेच्या सदस्यांना व्हिप जारी करण्यात आला आहे. जेव्हा अशा पद्धतीचा व्हिप जारी करण्यात आला आहे त्यावेळी संसदेत कोणतातरी मोठा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातं. आतापर्यंत कलम 370, तिहेरी तलाक, राम मंदिर ट्रस्टच्या नावची घोषणा अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे यावेळी कोणता मोठा निर्णय होणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
भाजपने अशा पद्धतीचा संसदेत व्हिप जारी केला तेव्हा मोठे निर्णय घेण्यात आले त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता निर्णय घेणार कोणता मुद्दा संसदेत मांडणार या संदर्भात कयास लावला जात आहे.
युनिफॉर्म सिविलकोडपासून ते दिल्लीच्या सीमारेषेपर्यंत नेमका कोणत्या निर्णयात बदल होणार आहे यासंदर्भात कयास लावला जात आहे. सोशल मीडियावर सर्वात वेगवान चर्चा होणारी चर्चा म्हणजे दिल्ली सीमारेषेत काही बदल केले जाऊ शकतात. ज्यामध्ये उत्तर प्रदेशमधील सीमा भागाचे विलीनीकरण, दिल्लीला विधानसभा नसलेले लडाखसारखे केंद्रशासित प्रदेश बनविले. आज संसदेत नेमका कोणता मोठा निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.