मराठी बातम्या /बातम्या /देश /

एका पिझ्झामुळे शेकडो लोकांचा जीव धोक्यात, डिलिव्हरी बॉय निघाला कोरोना पॉझिटिव्ह

एका पिझ्झामुळे शेकडो लोकांचा जीव धोक्यात, डिलिव्हरी बॉय निघाला कोरोना पॉझिटिव्ह

एका कुटुंबाला पिझ्झा मागवणं महागात पडलं आहे. नवी दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

एका कुटुंबाला पिझ्झा मागवणं महागात पडलं आहे. नवी दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

एका कुटुंबाला पिझ्झा मागवणं महागात पडलं आहे. नवी दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 16 एप्रिल : भारतात कोरोना वेगाने पसरत आहे. आतापर्यंत 12 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी हा 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र अशा परिस्थितीत एका कुटुंबाला पिझ्झा मागवणं महागात पडलं आहे. नवी दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. एका प्रसिद्ध पिझ्झा कंपनीचा डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह निघाल्यामुळे येथील 72 घरांना क्वारंटाइन केलं आहे.

जिल्हा न्यायदंडाधिकारी बी.एम. मिश्रा यांनी, मालवीय नगर परिसरातील प्रसिद्ध पिझ्झा चेनमधील डिलिव्हरी बॉयची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने दुकानातील त्याच्या 16 सहकाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. तसेच, ज्या घरांमध्ये त्याने पिझ्झाची डिलिव्हरी केली होती, त्या सर्वांना सेल्फ क्वारंटाइन करण्यास सांगितले आहे. पिझ्झा आउटलेटने आता खबरदारीचा उपाय म्हणून ऑर्डर घेणं बंद केलं आहे.

वाचा-नर्सिंग होममध्ये धक्कादायक परिस्थिती, जागा नाही म्हणून रस्त्यावर ठेवले 17 मृतदेह

'घाबरून जाण्याची गरज नाही'

मिश्रा यांनी सांगितले की, त्या दुकानातून पिझ्झा देण्यात आलेल्या सर्व 72 घरांची ओळख अधिकाऱ्यांनी केली आणि म्हणूनच प्रत्येकाला सावधगिरी बाळगण्याचे व स्वत: ला क्वारंटाइन ठेवण्यास सांगितले आहे. तसेच, डिलिव्हरी करताना या मुलाने मास्कचा वापर केल्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसल्याचही मिश्रा यांनी सांगितले आहे. डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांना अलग ठेवण्यात आले आहे. सध्या या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांवरही दैनंदिन निरीक्षण केले जात आहे.

वाचा-भारतात लवकरच तयार होणार कोरोनाची लस? शास्त्रज्ञांना मिळाली महत्त्वाची माहिती

दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी राजधानीत कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 1580 झाली आहे. एका दिवसात 17 नवीन प्रकरणे समोर आली आहे. तर, 2 लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 12 हजार पार, आतापर्यंत 414 रुग्णांचा मृत्यू

First published:

Tags: Corona