VIDEO : भांडणाचा रुग्णालयावर काढला राग, थेट पिकअप गाडीनं 8 वेळा केली तोडफोड

VIDEO : भांडणाचा रुग्णालयावर काढला राग, थेट पिकअप गाडीनं 8 वेळा केली तोडफोड

बालाजी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये 10 ते 15 वाहनांचं नुकसान झालं आहे. 2 वृद्ध व्यक्तींना उपचार देण्यावरून झालेल्या वादानंतर हा संपूर्ण प्रकार घडला.

  • Share this:

गुरुग्राम, 20 डिसेंबर : रुग्णालयात झालेल्या वादाचा राग एका तरुणानं काढत पिकअप गाडीच्या मदतीनं एक-दोन नाही तर तब्बल आठ वेळा धडक देऊन रुग्णालयाची तोडफोड केली आहे. रुग्णालयात दोन कुटुंबामध्ये झालेल्या वादाचा राग रुग्णालयावर काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांचं आणि औषध विभागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

गुरुग्राममधील रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेत मेडिकल स्टोअर आणि 10 हून अधिक वाहनांचं नुकसान झालं आहे. वसई चौक परिसरात बालाजी रुग्णालयात 2 वृद्ध व्यक्तींवर उपचार सुरू होते. दोन वृद्ध रुग्णांच्या उपचारांबद्दल एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर एका व्यक्तीने पिकअप ट्रकच्या सहाय्याने रुग्णालयाजवळ बांधलेल्या मेडिकल स्टोअरला जोरदार धडक दिली. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचा-भारताच्या शेजारी देशात राजकीय पेच, पंतप्रधानांची संसद विसर्जित करण्याची शिफारस

बालाजी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये 10 ते 15 वाहनांचं नुकसान झालं आहे. 2 वृद्ध व्यक्तींना उपचार देण्यावरून झालेल्या वादानंतर हा संपूर्ण प्रकार घडला. पिकअप गाडीनं धडक देणारा व्यक्ती हा रुग्णांचा नातेवाईक असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने रागाच्या भरात 7 ते 8 वेळा रुग्णालय आणि मेडिकलला जोरदार धडक दिली आणि निघून गेला. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा तपास सुरू आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 20, 2020, 2:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या