दिल्लीतील कर्मचाऱ्यांना मिळतो मुंबईतील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार-वर्ल्ड बॅंक

दिल्लीतील कर्मचाऱ्यांना मिळतो मुंबईतील कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त पगार-वर्ल्ड बॅंक

दिल्लीतील सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कॅशियरला दर महिन्याला कमीत कमी २१७.६ अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारणत: १४ हजार रुपये इतका पगार मिळतो.तर मुंबईत एका कॅशियरला सरासरी १३४ डॉलर म्हणजेच ८ हजार ६५० रुपये पगार मिळतो. याचा अर्थ दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा पगार मुंबईतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी जास्त आहे

  • Share this:

02 नोव्हेंबर: दिल्लीत मुंबईपेक्षा जास्त मिळतो असं जागतिक बॅंकेच्या एका अहवालामध्ये सांगितलंय. तर मुंबईकरांना दिल्लीकरांना मुंबईकरांपेक्षा जास्त सुट्ट्या मिळतात असंही हा अहवाल सांगतोय.

जागतिक बॅंकेच्या अहवालात अनेक निरीक्षण करण्यात आली आहेत. ईझ टू ट्रेड अहवालातही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत. मुंबईत मिळणारे पगार हे अनेक विकसनशील देशातील शहरात मिळणाऱ्या पगारांपेक्षा कमी आहेत. न्यू यॉर्कमधील कामगारांना खूप जास्त पगार मिळत असल्याचंही या अहवालात स्पष्ट झालंय. मुंबईकरांना वर्षासाठी सरासरी 21 सुट्ट्या तर दिल्लीकरांना 15 सुट्ट्या मिळतात.

दिल्लीतील सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कॅशियरला दर महिन्याला कमीत कमी २१७.६ अमेरिकन डॉलर म्हणजेच साधारणत: १४ हजार रुपये इतका पगार मिळतो.तर मुंबईत एका कॅशियरला सरासरी १३४ डॉलर म्हणजेच ८ हजार ६५० रुपये पगार मिळतो. याचा अर्थ दिल्लीतील कर्मचाऱ्यांचा पगार मुंबईतील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांनी जास्त आहे

मात्र असं असलं तरी व्यावसायिकांची दिल्लीपेक्षा मुंबईलाच जास्त पसंती आहे

First published: November 2, 2017, 11:03 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading