S M L

खंडणी मागितल्या प्रकरणी गँगस्टर अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा

पटियाला हाउस कोर्टने अंडरवल्ड डॉन अबू सालेमला 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 7, 2018 03:34 PM IST

खंडणी मागितल्या प्रकरणी गँगस्टर अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा

नवी दिल्ली, ता. 07 जून : पटियाला हाऊस कोर्टने अंडरवल्ड डॉन अबू सालेमला 7 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. अशोक गुप्ता या व्यापऱ्याकडून 5 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी शिक्षा सुनावली गेली आहे. मागील सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अबू सालेमला दोषी ठरवले होतं, पण त्याच्या शिक्षेचा निर्णय सुरक्षित ठेवण्यात आला होता.

एप्रिल 2002 साली अबू सालेमने मला खंडणीसाठी बोलावलं असल्याची कबूली अशोक गुप्ताने न्यायालयात दिली होती. दरम्यान, मी त्याला 5 कोटी रूपये नाही दिले तर मला आणि माझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी अबूने दिली होती.

त्यानंतर 5 एप्रिल 2004 रोजी पुन्हा एकदा गँगस्टर अबू सालेमला व्यापाऱ्यावर लवकरात लवकर पैसे परत केले नसल्यास कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती. व्यापारी अशोक गुप्ताकडून 5 कोटी खंडणी मागितल्याप्रकरणी अबू सलेमसोबत आणखी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातला एक आरोपी सज्जनकुमार सोनी याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, व्यापारी अशोक गुप्ता यांनी दिलेल्या याच माहितीवरून अखेर न्यायालयाने अबू सालेमला 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 7, 2018 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close