मराठी बातम्या /बातम्या /देश /राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली, नागरिकांची धावपळ, धक्के बसत असतानाचा पहिला Video

राजधानी दिल्ली भूकंपाने हादरली, नागरिकांची धावपळ, धक्के बसत असतानाचा पहिला Video

दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तान हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 21 मार्च : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतामध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. अफगाणिस्तान हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिल्ली-एनसीआरशिवाय हिमाचल, राजस्थानच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान असल्याचे सांगण्यात येत आहे. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.7 इतकी आहे.

रात्री 10 वाजून 17 मिनिटांनी अफगाणिस्तानपासून 90 किमी अंतरावर असलेल्या कालफगन येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप झाल्यानंतर घाबरलेले नागरिक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले, त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक मोठी गर्दी झाली.

उत्तर भारतात झालेल्या या भूकंपाच्या वेळचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओमधून या भूकंपाची दाहकता दिसून येते.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या फैजाबादपासून 133 किमी आग्नेय दिशेला 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपामुळे जीवित व वित्तहानी झाल्याची माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही.

2020 पर्यंत नॅशनल सिस्मॉलॉजिकल नेटवर्कमध्ये ७४५ भूकंपांची नोंद झाली आहे. ज्यामध्ये दिल्ली-एनसीआरमध्ये सप्टेंबर 2017 ते ऑगस्ट 2020 पर्यंत अशा 26 घटनांचे मोजमाप करण्यात आले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 किंवा त्याहून अधिक होती. गेल्या 20 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर उत्तर भारतात भूकंपाचा कोणताही निश्चित नमुना नाही. 2020 मध्ये दिल्ली आणि एनसीआरमध्ये अनेक छोटे-मोठे भूकंप जाणवले.

First published:
top videos