कोरोनाने मैत्री संपवली! लुडो खेळताना मित्र शिंकला म्हणून तरुणांनी काढली बंदूक आणि...

कोरोनाने मैत्री संपवली! लुडो खेळताना मित्र शिंकला म्हणून तरुणांनी काढली बंदूक आणि...

लॉकडाऊनच्यावेळी लुडो खेळत असलेल्या चार मित्रांमध्ये खोकल्यावरून वाद झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल : कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. यामुळे देशात लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या सगळ्यात ग्रेटर नोएडामधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नोएडाच्या दया नगरमध्ये मंगळवारी रात्री लॉकडाऊनच्यावेळी लुडो खेळत असलेल्या चार मित्रांमध्ये खोकला आणि शिंकण्यावरून वाद झाला. या घटनेत एका युवकाने आपल्याच मित्रावर गोळी झाडली.

वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, या तरूणाला गंभीर अवस्थेत ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपायुक्त राजेश कुमार सिंह यांनी याबाबत माहिती देताना, रात्री जय, वीर ऊर्फ गुल्लू, प्रवेश आणि प्रशांत हे चार मित्र दया नगरमधील मंदिराजवळ लुडो खेळत होते. दरम्यान प्रशांतला खोकला आहे. यावर गुल्लू आणि इतर मित्रांनी त्याला सांगितले की तो शिंकला आणि कोरोना विषाणूचा प्रसार करीत आहे. यानंतर मित्रांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात गुल्लूने प्रशांतवर गोळी झाडली.

वाचा-लॉकडाऊनमध्ये धारदार शस्त्रानं वार, पाहा तरुणाच्या हत्येचा थरारक VIDEO

गोळी लागल्याने युवक जखमी

प्रशांतच्या पायाला गोळी लागल्यानंतर जखमी तो जमीनीवर पडला. गोळीबाराच्या आवाजाने लोक घटनास्थळी जमले आणि त्यानंतर जखमी युवक प्रशांतला ग्रेटर नोएडाच्या कैलास रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला.

वाचा-ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा धोका वाढवणारी घटना

खोकल्याच्या भीतीने वाद

कोरोना विषाणू हा एक गंभीर संक्रामक रोग आहे जो खोकला आणि शिंकण्याद्वारे पसरतो, म्हणून लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. या बरोबरच लोकांना घराबाहेर पडताना फेस मास्क लावणे देखील बंधनकारक आहे जेणेकरुन या आजाराचा प्रसार रोखता येऊ शकेल. त्यामुळे खोकल्यामुळे या विषाणूचा संसर्ग होत असल्याच्या संशयावरून हा सर्व प्रकार घडला.

वाचा-लॉकडाऊनमध्ये वांद्र्यातील गर्दीमागे मोठं षड्यंत्र? वाचा नेमकं काय झालं

First published: April 15, 2020, 2:21 PM IST

ताज्या बातम्या