निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देणाऱ्या जल्लादला किती मिळते मानधन? ऐकून तुम्हीही व्हाल चकीत!

निर्भया प्रकरणातील दोषींना फाशी देणाऱ्या जल्लादला किती मिळते मानधन? ऐकून तुम्हीही व्हाल चकीत!

फाशीच्या एक दिवस आधी २० जानेवारीला जल्लाद तिहार तुरुंगात दाखल होणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी :  देश हादरवून टाकणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना 21 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दोषींची क्युरेटिव्ह म्हणजेच फेरविचार याचिका फेटाळली. त्यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा अटळ आहे. या दरम्यान दोषींना फाशी देणारा जल्लाद’ 20 जानेवारी रोजी तिहार तुरुंगात पोहोचणार आहे. तुरुंगाच्या नियमानुसार फाशीची शिक्षा दिलेल्या दोषीला फाशीच्या एक दिवस आधी त्याचे प्रात्यक्षित करावे लागते. यामध्ये अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जातात. त्यानुसार जल्लाद 20 तारखेच्या सायंकाळी फासावर लटकवण्याचे प्रात्यक्षित करणार आहे.

फासावर चढविण्याचे जल्लादला मिळणार 60 हजार रुपये

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देणाऱ्या पवन या जल्लादला एका दोषीला फाशी देण्याचे 15 हजार रुपये मिळतात. त्यानुसार चारही दोषींना फाशी देण्यासाठी जल्लादला तब्बल 60 हजार रुपये मिळणार आहेत.

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय तणावात

दोषी विनय याच्या वडिलांनी त्याची तिहार तुरुंगात भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दोषींच्या तुलनेत विनय अधिक तणावात दिसून येत आहे. तो अत्यंत अस्वस्थ आहे. तिहार तुरुंगातील अनेक नियमभंगामध्ये त्याचे नाव आहे. यासाठी त्याला सर्वाधिक शिक्षाही मिळाली आहे. विनयला नियमांचे उल्लंघन करण्यासाठी 11 वेळा, मुकेशला 3, पवनला 8 तर अक्षयला एक वेळा शिक्षा मिळाली आहे. याव्यतिरिक्त तुरुंगात काम केल्याबद्दल अक्षयने 69,000 रु., विनयने 39,000 रु.  आणि पवनने 29,000 रुपये कमावले आहे. चौथा दोषी मुकेशने या दरम्यान काहीच काम केले नसल्याचे सांगितले जात आहे.

Published by: Suraj Yadav
First published: January 15, 2020, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading