दिल्लीत लागलेली भीषण आग अजूनही आटोक्यात नाही, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

दिल्लीत लागलेली भीषण आग अजूनही आटोक्यात नाही, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीतील पीरागढी परिसरात बॅटरी फॅक्टरीला लागलेली आग अजूनही धुमसतेय.

  • Share this:

नवी दिल्ली,2 डिसेंबर: देशाची राजधानी दिल्लीतील (Delhi) पीरागढी (Peeragarhi) परिसरात बॅटरी फॅक्टरीला लागलेली आग अजूनही धुमसतेय. आग विझवताना अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर फॅक्टरीत मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे बिल्डिंगचा मोठी भाग कोसळला. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून काही जवान जखमी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे जवान (NDRF) घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना एका जवानाचा मृत्यू झाला.

मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सकाळी चार वाजून 23 मिनिटांला ही आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझवत असताना एक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की, आवाजाचाने बिल्डिंगचा एक भाग कोसळला. त्यामुळे अग्निशमन दलाचे काही जवान जखमी झाले तर काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ज

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख..

आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु:ख व्यक्त केले आहे. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांवर योग्य उपचार करण्यात येत असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2020 11:54 AM IST

ताज्या बातम्या