लहरी हवा : राजधानीत आणीबाणी; महाराष्ट्रात वादळ

लहरी हवा : राजधानीत आणीबाणी; महाराष्ट्रात वादळ

दिल्लीची हवा श्वास घेण्यालायकीची हवा राहिलेली नाही. दिल्ली सरकारने (Delhi pollution) आरोग्य आणीबाणी (Emergency) जाहीर केली आहे. तर महाराष्ट्रात क्यार वादळानंतर आणखी एक वादळ अरबी समुद्रात निर्माण झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : राजधानी दिल्लीची हवा आणखी बिघडली आहे. आता तिथे श्वास घेण्यालायकीची हवा राहिलेली नाही, एवढं जास्त प्रदूषण हवेत आहे. दिल्ली सरकारने (Delhi pollution) या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून राज्यात आरोग्य आणीबाणी (Emergency) जाहीर केली आहे. पुढचे 3 दिवस शाळा बंद राहतील. नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं. नाहीतर बंद घरांमध्येच राहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. दुसरीकडे अवघा महाराष्ट्र थंडीची वाट पाहात असताना अजून पाऊस थांबायचं नाव घेत नाही. क्यार वादळानंतर आणखी एक वादळ अरबी समुद्रात निर्माण झालं आहे. महा (cyclone Maha) नावाच्या या वादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पुढचे किमान 3 दिवस वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

दिल्लीची हवा बिघडण्याचं कारण शेजारी राज्यांमध्ये शेतजमीनींना आणि चिपाडांना लावण्यात येणारी आग. त्यात दिवाळीच्या फटाक्यांची भर पडली आणि वातावरण आणखी बिघडलं.

वाचा - भारतात बेरोजगारीचा दर वाढला, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गाठला नीचांक

आता हिवाळा संपेपर्पंयत फटाके उडवण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

दिल्लीत हवेतले पोल्युटंट प्रचंड वाढले आहेत. एअर क्वालिटी इंडेक्स AQI म्हणजे हवेतल्या घातक कणांची संख्या 500 च्या वर पोहोचली आहे.

हे प्रमाण 0 ते 50 दरम्यान असेल तरच हवा चांगली असल्याचं मानलं जातं. दिल्लीची हवा हिवाळ्यात वाईट होते आणि AQI 400 च्या आसपास पोहोचतो. या वेळी तो 500 च्या वर पोहोचल्यामुळे Emergency जाहीर केली आहे.

या हवेचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. श्वसनाचे रोग, दमा, खोकला असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. निरोगी माणसांनाही या हवेमुळे फुप्फुसाचे विकार होऊ शकतात.

वाचा - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार, पिकांची केली पाहणी

हिवाळ्यात दिल्लीची हवा दाट धुक्यात अडकलेल्या धुरामुळे आधीच खराब असते. याला धुरकं किंवा SMOG म्हणतात. दृश्यमानता कमी होते, त्यामुळे अपघातांचं प्रमाणही वाढतं. फटाक्याच्या धुरामुळे घातक असे प्रदूषणाचे कण हवेत आहेत. हवा मोकळी होत नाहीत, तोवर ते हवेच्या खालच्या थरातच अडकून पडणार आहेत. त्यामुळे पुढचे तीन दिवस दिल्लीकरांसाठी धोक्याचे आहेत.

----------------------------------------

अन्य बातम्या

कुख्यात गुंडाचे घृणास्पद कारनामे उघड, महिलांचे लैंगिक शोषण करत वसूल केलं व्याज

निकसोबतचं लग्न टिकवण्यासाठी प्रियांकाचा आटापिटा, पाळतेय 'हा' नियम

'नवीन सरकार लवकर येणं आवश्यक कारण....' शरद पवारांनी व्यक्त केली खरी काळजी

रॅम्प वॉक करताना पाकिस्तानी मॉडेल अडखळली आणि...; पाहा हा Viral Video

First published: November 1, 2019, 4:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading