Home /News /national /

तरुणीशी मैत्री करणं तरुणाच्या जीवावर बेतलं, नातेवाईकांनी केली बेदम मारहाण अन्...

तरुणीशी मैत्री करणं तरुणाच्या जीवावर बेतलं, नातेवाईकांनी केली बेदम मारहाण अन्...

तरुणीनंच फोन करून राहुलला बाहेर बोलावलं...

    नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर: राजधानी दिल्लीत तरुणीशी मैत्री करणं एका विद्यार्थ्याच्या जीवावर बेतलं आहे. तरुणीच्या नातेवाईकांनी विद्यार्थाला एवढं मारलं की त्यातच त्याचा मृत्यू झाला. आदर्श नगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद राज आणि मनवव्वर हुसैन यांच्या पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यात तीन अल्पवयीन आहेत. हेही वाचा..धक्कादायक! किरकोळ वादातून अंगावर फेकलं अॅसिड, 5 जण होरपळले मिळालेली माहिती अशी की, राहुल राजपूत (वय-18, रा. आदर्श नगर) असं मृत तरुणाचं नाव असून तो दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होता. एवढंच नाही तर तो घरी विद्यार्थ्यांची ट्यूशन घेत होता. राहुलचे वडील ड्रायव्हर आहे. राहुलची आई रेणू यांनी सांगितलं की, बुधवारी राहुलला एक फोन आला होता. ट्यूशनबाबत बोलण्यासाठी त्याला बाहेर बोलवलं. घरापासून काही अंतरावर त्यात चार-पाच जणांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यातच राहुलचा मृत्यू झाला. राहुल ट्यूशन घेत असल्यामुळे अनेक विद्यार्थी त्याला संपर्क करत होते. मात्र, अशा पद्धतीने राहुलची कोणी कशी हत्या करू शकतं, अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तरुणीनं फोन करून बाहेर बोलावलं... राहुलचे वडील संजय राजपूत यांनी सांगितलं की, याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. मात्र, राहुलला बेदम मारहाण करणारे जवळपास 15 जण होते, असा आरोप संजय राजपूत यांनी केला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आरोपींसोबत एक तरुणी देखील होती. त्या तरुणीची देखील चौकशी होणे गरजेचं आहे. तिनंच राहुलला फोन करून बाहेर बोलावलं होतं, असं राहुलच्या वडिलांनी सांगितलं. पण खूप उशीर झाला होता... राहुलचे काका धर्मपाल राजपूत यांनी सांगितलं की, बुधवारी एक व्यक्त पळत आला. तो म्हणाला की, काही लोक राहुलला बेदम मारहाण करत आहे. तातडीनं घटनास्थळी पोहोचलो. राहुलची त्यांच्या तावडीतून सुटका केली. गंभीर जखमी अवस्थेत राहुलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला बाबू जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Delhi

    पुढील बातम्या