प्रदुषण टाळण्यासाठी तब्बल 46 खासदार संसदेत येतात 'या' खास वाहनाने

प्रदुषण टाळण्यासाठी तब्बल 46 खासदार संसदेत येतात 'या' खास वाहनाने

'फिटनेस आणि प्रदुषण टाळायचं असेल तर कार्सचा वापर टाळलाच पाहिजे. त्यामुळे खर्चातही बचत होते.'

  • Share this:

नवी दिल्ली 19 जून :  संसदेतल्या चर्चेत भाग घेणं, प्रश्न विचारणं, सरकारला धारेवर धरणं, त्यांचा बचाव करणं अशी अनेक कामं खासदार धडाडीने करत असतात. त्याचबरोबर अनेक उपक्रमही काही खासदार राबवत असतात. पर्यायावरण रक्षण आणि प्रदुषण टाळण्यासाठी काही खासदारांनी पुढाकार घेत एक 'सायकल क्लब'स्थापन केला असून त्याची संख्या आता 46 झालीय. या क्लबचे सर्व खासदार हे संसदेत येण्यासाठी सायकलचा वापर करत असतात.

केंद्रीय मंत्री मनसुख लाल मांडविया  हे गेली अनेक वर्ष संसदेत सायकलनेच येत असतात. शपथविधी समारंभालाही ते सायकलनेच गेले होते. त्यावेळी त्याची चर्चाही झाली होती. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन हेही संसदेत अनेकदा सायकलने येत असतात. अर्जुन राम मेघवाल, केटीएस तुलसी, डॉ. विकास महात्मे हेही संसदेत सायकलनेच येतात.

अशी झाली सुरुवात

सायकल क्लब सोबतच या क्लबला क्लायमेट क्लब असंही म्हटलं जातं. मांडविया म्हणाले, काही वर्षांपूर्वी त्यांना संसदेच्या जवळच फ्लॅट मिळाला होता. संसदेत येण्यासाठी दररोज 10 ते 15 मिनीटं वाट पाहावी लागत असते. घरापासून संसद ही अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. गाडीची वाट पाहत असताना संसदेत सायकलने जाण्याची कल्पना सुचली आणि ती अंमलात आणली.

सुरुवातीला या क्लबचे पाच सदस्य होते. ही संख्या वाढत जाऊन आता ती 46 झाल्याची माहितीही त्यांनी दिली. मनसुख लाल मांडविया हे गुजरातचे असून भाजपचे नेते आहेत.

सनी देओलची खासदारकी धोक्यात?

अभिनेते आणि गुरुदासपूरचे भाजपचे खासदार सनी देओल यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने खर्चाची जी मर्यादा घालून दिली होती. त्या मर्यादेचं उल्लंघन केल्याचा ठापका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. आयोगाने देओल यांना नोटील पाठवली असून स्पष्टीकरण मागितलं आहे. यात ते दोषी आढळले तर त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. सनी देओल यांच्याकडून काय उत्तर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादा 70 लाख एवढी घालून दिलीय. देओल यांच्या खर्चाचा जो अहवाल आयोगाला मिळाला त्यात त्यांचा खर्च हा 86 लाखांपेक्षा जास्त झाला असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे कारवाई करण्याआधी आयोगाने देओल यांना स्पष्टीकरण मागितलंय.

तर आयोगाला जो अहवाल मिळाला आहे, तो चुकीचा असल्याचं देओल यांच्या कार्यालयाने म्हटलं आहे. लवकरच खर्चाचा नवा अहवाल सादर करू असं सांगण्यात आलंय. देओल यांनी खर्च जास्त केल्याचं आढळून आलं तर आयोग त्यांचं सदस्यत्व रद्द करू शकतं आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेल्या उमेदवाराला विजयी घोषीत करू शकतं असा अधिकार आयोगाला आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 19, 2019 05:52 PM IST

ताज्या बातम्या