'मेट्रो'च्या कर्मचाऱ्याने Facebook Live करत केली आत्महत्या

शुभंकरने सकाळी 11 च्या सुमारास फेसबुक लाईव्ह केलं. तो कुलरवर चढत असल्याचं त्यातून स्पष्ट होतं. वर चढण्यापूर्वी त्यांनी आपल्या आयकार्डचं दोन वेळा चुंबन घेतलं आणि गळफास लावला.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 08:16 PM IST

'मेट्रो'च्या कर्मचाऱ्याने Facebook Live करत केली आत्महत्या

नवी दिल्ली 11 ऑगस्ट :  राजधानी दिल्लीतल्या एका कर्मचाऱ्याने  Facebook Live करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. शुभंकर चक्रवर्ती असं त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. शुभंकरच्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या काही मित्रांनी हा प्रकार लाईव्ह बघितला आणि त्यांना धक्काच बसला. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तो राहत असलेली खोली उघडण्यात आली होती तेव्हा तो मृतावस्थेत आढळला. शुभंकरच्या मृत्यूचं कारण अद्याप कळालेलं नाही. पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र त्याच्या मित्रांना प्रचंड मोठा धक्का बसलाय.

महापूरातल्या मृत्यूची संख्या 40 वर, आर्थिक नुकसानीचा तर हिशेबच नाही

27 वर्षांचा शुभंकर हा पश्चिम बंगालच्या 24 परगना या जिल्ह्यातला होता. दिल्ली मेट्रोच्या इलेक्ट्रीक विभागात तो काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच तो नोकरीला लागला होता. त्याच्या खोलीत आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

'संघा'मुळेच चिघळला काश्मीरचा प्रश्न, इम्रान खान यांची RSSवर टीका

शुभंकरने सकाळी 11 च्या सुमारास फेसबुक लाईव्ह केलं. तो कुलरवर चढत असल्याचं त्यातून स्पष्ट होतं. वर चढण्यापूर्वी त्यांनी आपल्या आयकार्डचं दोन वेळा चुंबन घेतलं आणि गळफास लावला. हे जेव्हा त्यांच्या फेसबुकवरच्या मित्रांना कळालं तेव्हा त्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. खोलीचा दरवाजा बंद होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती देऊन दरवाजा उघडला तेव्हा सगळं संपलं होतं. शुभंकरला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं.

Loading...

पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांनाही घेटनेची माहिती दिलीय. त्याला बहिणी असून तो घरात एकटाच मुलगा होता. 16 वर्षांपूर्वी त्याच्या आईचं निधन झालं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 08:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...