महिला प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! राजधानीत मोफत प्रवास

दिल्लीमधल्या महिला प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी आहे. आता त्या मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करू शकणार आहेत. दिल्लीच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 3, 2019 04:36 PM IST

महिला प्रवाशांसाठी मोठी खुशखबर! राजधानीत मोफत प्रवास

दिल्ली, 3 जून : दिल्लीमधल्या महिला प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी आहे. आता त्या मेट्रो आणि बसचा प्रवास मोफत करू शकणार आहेत. दिल्लीच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.

सरकारच्या तिजोरीवर भार

मेट्रोच्या प्रवाशांपैकी 33 टक्के महिला प्रवासी आहेत. ही आकडेवारी लक्षात घेतली तर या योजनेसाठी दरवर्षी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च येईल. ही योजना लागू झाल्यानंतर दिल्ली सरकारवर दरवर्षी 1200 कोटी रुपयाचा भार पडेल.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर आता दिल्लीमधल्या महिलांना मेट्रो किंवा बसच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ट घेण्याची गरज राहिलेली नाही.

दिल्लीमधल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. अशा वेळी जर बस किंवा मेट्रोचा प्रवास मोफत असेल तर या महिला सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा जास्त वापर करतील. महिलांच्या मोफत प्रवासामुळे दिल्ली मेट्रोचं जे नुकसान होईल त्याची भरपाई सरकार करेल, असंही ते म्हणाले.

Loading...

चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे

महिलांच्या सुरक्षेसाठी शहरातल्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रकल्प सरकारने हाती घेतला आहे. 8 जूनपासून हे कॅमेरे लावण्यात येतील आणि हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपची टीका

अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेवर भाजपने टीका केली आहे. केजरीवाल यांनी महिलांच्या मोफत प्रवासाची घोषणा तर केली आहे पण ही योजना लागू करणं कठीण आहे, असं भाजप नेते मनोज तिवारी म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आता निवडणुकांच्या काळात अशा अनेक घोषणा ते करतील,अशी टीकाही मनोज तिवारी यांनी केली.

========================================================================

VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 3, 2019 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...