• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • BREAKING : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय उलथापालथ होणार?

BREAKING : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबतं; राजकीय उलथापालथ होणार?

PM Narendra Modi Sharad Pawar Meeting in Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात दिल्लीत भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 17 जुलै : देशाची राजधानी दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात दिल्लीत एक बैठक झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. (Sharad Pawar meet with PM Narendra Modi) मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयात शनिवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 50 मिनिटे बैठक झाली असून या भेटीत राजकीय विषयांवरही चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लिला रामदास यांनी सांगितले की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीच्या दरम्यान महाराष्ट्रात ज्या पद्धतीने राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याबद्दल चर्चा झाली आहे. काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चेबाबतची दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांत झालेल्या या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात असून राजकीय उलथापालथच्या दिशेने हे पाऊल तर नाहीये ना? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. फडणवीस - अमित शहा यांच्यात बैठक सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून नंतर पहिल्यांदाच अमित शाह यांची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी ही भेट झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर चर्चा झाली. येत्या काळात सहकार क्षेत्रातील गैरव्यवहाराची चौकशी अधिक सखोल होणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकातं पाटील यांनी राज्यातील काही साखर कारखान्यांत गैरव्यवहार झाल्याचं सांगत अमित शहा यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर सहकार मंत्रालय हे अमित शहा यांच्याकडे आलं आणि त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली असून त्यातही साखर कारखान्यांतील गैरव्यवहाराबाबत चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहार प्रकरणात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाली असून अनिल देशमुख प्रकरणावरही चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
Published by:Sunil Desale
First published: