Delhi MCD Election Result 2021: आम आदमी पार्टीने मारली बाजी, भाजपचा सूपडा साफ

Delhi MCD Election Result 2021: आम आदमी पार्टीने मारली बाजी, भाजपचा सूपडा साफ

Delhi MCD Election Result 2021: गुजरातमध्ये पालिका निवडणुकांमध्ये दमदार एंट्री केल्यानंतर आम आदमी पार्टीचा (AAP) दिल्लीमध्ये देखील दरारा पाहायला मिळाला. 'आप'ने दिल्ली महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत चमकदार कामगिरी केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मार्च: गुजरातमध्ये पालिका निवडणुकांमध्ये दमदार एंट्री केल्यानंतर आम आदमी पार्टीचा (AAP) दिल्लीमध्ये देखील दरारा पाहायला मिळाला.  'आप'ने दिल्ली महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत (Delhi MCD Election Result 2021) चमकदार कामगिरी केली असून पाचपैकी चार प्रभाग आपने जिंकले आहेत. उत्तर पूर्व दिल्लीच्या मुस्लिम बहुल वॉर्ड असणाऱ्या चौहान बांगरमध्ये कॉंग्रेसने बाजी मारली आहे. येथे कॉंग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळविला. दंगलीचा सर्वाधिक परिणाम झालेला हा परिसर आहे. या निवडणुकांमध्ये भाजपचा सूपडा साफ झाल्याचे दिसले. दिल्ली महानगरपालिका सध्या भाजपाच्या ताब्यात आहे. पुढील वर्षी येथे निवडणुका होणार आहेत. यापूर्वी या पोटनिवडणुकांना या सत्तेच्या शर्यतीतील सेमीफायनल मानलं जात आहे.

कुणी मारली बाजी?

-रोहिणी-सी वार्डमधून आपचे उमेदवार रामचंद्र 2985 मतांनी जिंकले

-शालीमार बागमध्ये आपच्या उमेदवार सुनीता मिश्रा 2706 मतांनी जिंकल्या

-कल्याणपुरीमध्ये आपचे उमेदवार धीरेंद्र कुमार 7000 मतांनी जिंकले, त्यांनी भाजपच्या सियाराम यांना हरवले.

(हे वाचा-मुंबईसारखं आणखी एक Blackout, 'या' राज्यावर चीनी हॅकर्सची नजर)

-त्रिलोकपुरीमध्ये देखील आपने बाजी मारली

- चौहान बांगर या सीटवर काँग्रेसचे माजी आमदार चौधरी मतीन अहमद यांचे पुत्र चौधरी जुबेर अहमद यांनी आपचे माजी आमदार हाजी इशराक यांना हरवलं आहे. हा मुस्लिम बहुल वॉर्ड आहे.

(हे वाचा-राहुल गांधी म्हणाले, ‘आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक, पण...')

2022 च्या महानगरपालिका निवडणुकांची दिशा ठरवेल ही पोटनिवडणूक

या पोटनिवडणुकीमधून 2022 साली होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांची दिशा ठरवली जाईल तसंच जनतेचा कल कुणाकडे आहे हे देखील निकालातून स्पष्ट होत आहे. तिनही पक्ष्यांनी निवडणुकीनंतर जिंकण्याचा दावा केला होता पण त्यात आता आम आदमी पार्टीने बाजी मारली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 3, 2021, 11:23 AM IST

ताज्या बातम्या