दिल्लीत अचानक बंद झालं मार्केट आणि स्टेशन्स, पुन्हा काय घडलं?

दिल्लीत अचानक बंद झालं मार्केट आणि स्टेशन्स, पुन्हा काय घडलं?

देशाची राजधानी दिल्लीतील वातावरण हिंसाचारामुळं तणापूर्ण झालं होतं. यामध्ये आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 मार्च : देशाची राजधानी दिल्लीतील वातावरण हिंसाचारामुळं तणापूर्ण झालं होतं. यामध्ये आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, दिल्लीच्या शांत असलेल्या पश्चिम भागातील तिलक नगर इथं आज सायंकाळच्या सुमारास अचानक गोंधळाचं वातावरण तयार झालं. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव डीएमआरसीने तिलक नगर मेट्रो स्टेशनही बंद केलं गेलं. पोलिसांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, रघुवीर नगर, विष्णू गार्डन आणि ख्याला इथं हिंसाचाराची अफवा पसरली. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं की या अफवांवर विश्वास ठेवू नका.

तिलक नगर भागात हिंसाचाराची अफवा पसरल्यानंतर तिलक नगर, नांगलोई, सुरजमल स्टेडियम, बदरपूर, तुघलकाबाद, उत्तम नगर आणि नवादा मेट्रो स्टेशनचे गेट बंद कऱण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, तिलक नगर बाजारात पसरलेल्या अफवेनंतर तिलक नगरचे आमदार जरनेल सिंग यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. यात त्यांनी म्हटलं की,'तिलक नगर बाजारात हिंसाचाराबाबत समजताच मी तिथं पोहोचलो. तेव्हा लोकांचा गोंधळ सुरू होता. दुकाने बंद झाली होती. मात्र त्याठिकाणी कुठंही हिंसाचार सुरू नव्हता. कुणीतरी अफवा पसरवली असावी.

''अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता आणि सौहार्दाचं वातावरण राखा. तसंच या ठिकाणी पोहोचल्यानंतर पोलिसांची चौकी रिकामी पाहून धक्काच बसला'' असं आमदार जरनेल सिंग यांनी सांगितलं आहे.

याशिवाय मदन पूर खादर इथंही हिंसाचार झाल्याची अफवा पसरली होती असं ट्विट आमदार अमानतुल्लाह खान यांनी केलं आहे. ते म्हणाले की, अफवा पसरत आहेत तुम्ही विश्वास ठेवू नका. हरी नगर किंवा बुद्धविहार इथं काहीही झालेलं नाही. सर्व काही सुरळीत सुरु आहे असंही अमानतुल्लाह यांनी म्हटलं.

रविवारी दुपारी भागिरथी विहार इथल्या नाल्यात आणखी दोन मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. मृतांची संख्या आता 45 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, आज सापडलेल्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही.

संबंधित : दिल्ली हिंसाचार : चिमुकलीच्या बोबड्या बोलांनी तरी दिल्ली शांत होईल? पाहा VIDEO

First published: March 1, 2020, 9:18 PM IST
Tags: delhi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading