मराठी बातम्या /बातम्या /देश /पाण्याचे फुगे फेकणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या नादात झालं भांडणं; चाकूने केले 50 वार

पाण्याचे फुगे फेकणाऱ्या मुलाला वाचवण्याच्या नादात झालं भांडणं; चाकूने केले 50 वार

'बुरा ना मानो होली है' असं म्हणत खरंतर आज रंगांची उधळण केली जाते. पण दिल्लीत मात्र...

'बुरा ना मानो होली है' असं म्हणत खरंतर आज रंगांची उधळण केली जाते. पण दिल्लीत मात्र...

'बुरा ना मानो होली है' असं म्हणत खरंतर आज रंगांची उधळण केली जाते. पण दिल्लीत मात्र...

    दिल्ली, 02 मार्च : 'बुरा ना मानो होली है' असं म्हणत खरंतर आज रंगांची उधळण केली जाते. पण दिल्लीत मात्र पाण्याचे फुगे अंगावर फेकल्यामुळे थेट चाकूनेच 50 वार केले. होय, दिल्लीच्या खानपुर भागात गुरूवारी संध्याकाळी पाण्याचे फुगे फेकल्याच्या रागामुळे 22 वर्षाच्या व्यक्तीवर 20 हल्लेखोरांनी चाकूने वार केले. हल्लेखोरांनी आधी त्या व्यक्तीला लोखंडी रॉडने बेदम मारले आणि मग त्याच्यावर चाकुने 50 वार केले. दिल्लीतला हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

    सूत्रांच्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी एक मुलाने 2 व्यक्तींवर पाण्याचे फुगे फेकले. त्यामुळे राग आलेल्या या दोघांनी त्याला बाहेर खेचलं आणि त्याला बेदम मारहाण केली. बाजूला राहणाऱ्या आशिष या इसमानं त्यांना मारहाण करण्यापासून रोखलं. पण यातून वाद थांबला नाही तर आणखीच चिघळला. तुला आता दाखवतोच अशी धमकी त्यांनी दिली आणि तिथून निघून गेले.

    यानंतर संध्याकाळी 4 वाजल्याच्या सुमारास आशिष जिमला जाण्यासाठी बाहेर निघाला आणि काही बाईकस्वारांनी त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान आशिषला 20 हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने मारलं आणि नंतर त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि तिथून पळ काढला.

    आशिषने आरडाओरड केल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

    या सगळ्या प्रकारासंबंधी सराय पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    First published:

    Tags: Delhi, Kid threw water balloons, Man stabbed 50 times, Saving kid, चाकूने 50 वार, दिल्ली, पाण्याचे फुगे, मारहाण, होळी