News18 Lokmat

सिगारेट शेअर करायला नकार; 23 वर्षाच्या तरूणावर गोळीबार

सिगारेट शेअर करायला नकार दिल्यानं दिल्लीत 23 वर्षाच्या तरूणावर गोळीबार करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 04:25 PM IST

सिगारेट शेअर करायला नकार; 23 वर्षाच्या तरूणावर गोळीबार

नवी दिल्ली, 26 एप्रिल : राजधानी दिल्लीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, सिगारेट शेअर करायला नकार दिल्यानं 23 वर्षाच्या तरूणावर दोन अनोळखी बाईक स्वारांनं गोळी झाडली आहे. दिल्लीतील शालीमार बागेमध्ये ही घटना घडली आहे. अमिर खान असं यामध्ये जखमी झालेल्या तरूणाचं नाव आहे. गोळीबारामध्ये अमिर खानच्या छातीच्या डाव्या भागाला दुखापत झाली आहे. बुधवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अमिर खान आणि त्याचा मित्र एका शॉपिंग मॉलजवळ उभे होते. यावेळी बाईकवरून दोन जण आले. त्यानंतर त्यांनी सिगारेटची मागणी केली. पण, अमिर खान आणि त्याच्या मित्रानं सिगारेट द्यायला नकार दिला. त्यानंतर बाचाबाची देखील झाली. दरम्यान, बाईकवरील एका व्यक्तिनं गोळी झाडली आणि दोघंही पसार झाले.

पोलिसांची कारवाई

या हल्ल्यामध्ये अमिर खान जखमी झाला असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी देखील गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

यापूर्वी देखील घडल्या होत्या घटना

यापूर्वी देखील दिल्लीमध्ये ऑगस्ट 2018मध्ये जवाहरलाल नेहरू युनिर्व्हसिटीच्या कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला करत त्याला भोसकलं होतं. या कर्मचाऱ्यांनं सिगरेटचं दुकानं कुठं आहे? असं विचारल्यानंतर सांगण्यास टाळाटाळ केली होती. यामध्ये त्याचा चुलत भाऊ जखमी झाला होता.

Loading...

तर, दुसरीकडे मार्च 2018मध्ये देखील सिगारेट देण्यास नकार दिल्यानं 22 वर्षाच्या कंम्युटर डिझायनरला भोकसलं गेलं होत. नेताजी सुभाष पॅलेस सिग्नलजवळ ही घटना घडली होती.


VIDEO: वाराणसीत उद्धव ठाकरेंनी घेतलं कालभैरवाचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...