द्वारका, 26 ऑगस्ट: दिल्लीच्या द्वारका परिसरात नरेंद्र नावाच्या प्रॉपर्टी डिलरची कारमध्ये बसलेला असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हेल्मेट घातून आलेल्या गुंडानं कारमध्ये बसलेल्या नरेंद्रवर गोळीबार केला. स्वत: चा बचाव करण्यासाठी नरेंद्रनं कारमधून पळ काढला. मात्र हल्लेखोरानं पाठलाग करत नरेंद्रच्या पाठीत गोळ्या घातल्या.