मोठ्या भावानं कुटुंबासमोरच लहान भावाला घातल्या गोळ्या; कारण...

मोठ्या भावानं कुटुंबासमोरच लहान भावाला घातल्या गोळ्या; कारण...

मोठ्या भावानं लहान भावाची गोळ्या झाडून हत्या केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 मे : विवाहबाह्य संबंध आणि संपत्तीची होणारी उधळपट्टी यामुळं मोठ्या भावानं लहान भावावर गोळ्या झाडल्याचा प्रकार राजधानी दिल्लीतील द्वारका परिसरामध्ये घडला आहे. पत्नी आणि मुलासमोर ही घटना घडली आहे. मनोज यादव ( 34 वर्षे ) असं आरोपीचं नाव आहे. तर, शीव कुमार असं मृत व्यक्तिचं नाव आहे. शीव यादवचे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे शीव घरातील संपत्ती मौज मजा करण्यासाठी खर्च करत होता. परिणामी, मनोजला या साऱ्या प्रकाराचा राग आला. यावरून दोन्ही भावांमध्ये कडाक्याचं भांडण देखील झालं. अखेर मनोज यादवला राग अनावर झाला. त्यानंतर त्यानं शीव यादवला त्याच्या पत्नीच्या आणि मुलाच्या डोळ्यादेखत गोळ्या घातल्या.

नरेंद्र मोदी – अमित शहांना क्लिन चीट देण्यास ECच्या या अधिकाऱ्याचा होता विरोध

रागातून झाडल्या गोळ्या

रागारागनं मनोज यादव शीवच्या घरी आला. त्यानंतर त्यानं शीवला शिवीगाळ केली. शिवाय, कॉलरला हात घालत शीववर गावठी पिस्तलातून गोळ्या झाडल्या. द्वारका परिसरात घडलेल्या या घटनेनं सारी दिल्ली हादरून गेली. यानंतर शीवच्या घरच्यांनी मनोजला अडवण्याचा प्रयत्न केला पण, पळून जाण्यास मनोज यशस्वी झाला होता.

त्यानंतर शीव यादवला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, त्यापूर्वीच शीव यादव मृत पावला होता. रूग्णालयामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी शीवला मृत घोषित केलं. त्यानंतर शुक्रवारी रात्री मनोज कुमारला अटक देखील करण्यात आली आहे. शीवचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध होते. त्यातून तो मोठ्या प्रमाणावर संपत्तीची उधळपट्टी करत होता. त्याच रागातून लहान भावाची हत्या केल्याचं मनोजनं आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे. मनोज कुमार हा व्यवसायानं प्रॉपर्टी डीलर आहे.

SPECIAL REPORT: बच्चे कंपनीची राजकीय जुगलबंदी, '...लाव रे तो व्हिडिओ'

First published: May 5, 2019, 3:07 PM IST
Tags: crime

ताज्या बातम्या