VIDEO : आपच्या उमेदवार आतिशी यांना गौतम गंभीरमुळे कोसळलं रडू

दिल्लीमधल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी यांना एका पत्रकार परिषेदत रडू कोसळलं. भाजपचे उमेदवार गौतम गंभीर यांनी आतिशी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पत्रकं वाटली, असा आपचा आरोप आहे.

News18 Lokmat | Updated On: May 9, 2019 05:18 PM IST

VIDEO : आपच्या उमेदवार आतिशी यांना गौतम गंभीरमुळे कोसळलं रडू

दिल्ली, 9 मे : दिल्लीमधल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार आतिशी यांना एका पत्रकार परिषेदत रडू कोसळलं. आतिशी या पूर्व दिल्लीमधून गौतम गंभीरच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

भाजपचे लोकसभेचे उमेदवार गौतम गंभीर यांनी आतिशी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पत्रकं वाटली, असा आपचा आरोप आहे. यासाठीच आतिशी आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत आतिशी चक्क रडायला लागल्या.गौतम गंभीर यांचा या निवडणुकीत पराभव होऊ शकतो. याच भीतीने त्यांनी माझ्याविरुद्ध अपप्रचार चालवला आहे, असा आरोप त्यांनी केला. मी पैशासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...

गौतम गंभीर यांच्यावर टीका

या पत्रकवाटप प्रकरणात आप चे नेते मनीष सिसोदिया यांनी गौतम गंभीर यांना लक्ष्य केलं आहे. त्यांनी गौतम गंभीर यांच्याविरोधात ट्वीटही केलं आहे. तुम्ही आतिशी यांच्याविरोधात पत्रकं वाटूनही निवडणूक जिंकू पाहात असाल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असं मनीष सिसोदिया यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आतिशी आणि आप यांनी आपल्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर मी माझी उमेदवारी मागे घेईन, असं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे. पण जर हे आरोप सिद्ध झाले नाहीत तर तुम्ही राजकारण सोडणार का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.
'आप'चा पाठिंबा

गौतम गंभीर इतक्या खालच्या पातळीला जातील, असं मला वाटलं नव्हतं, अशी टिप्पणी अरविंद केजरीवाल यांनीही केली. या सगळ्या स्थितीत एखाद्या महिलेला कसं काय सुरक्षित वाटेल, असा सवाल त्यांनी केला. आम आदमी पार्टी आतिशी यांच्या पाठिशी आहे, असा दिलासाही त्यांनी दिला.

दिल्लीत 12 मे ला मतदान

दिल्लीमधल्या सातही जागांसाठी 12 मे ला मतदान होतं आहे. इथे भाजप, काँग्रेस आणि आप यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे. त्यातही भाजप आणि आपमध्ये अटीतटीची लढत आहे.

============================================================================

VIDEO: विरोधकांनी जवळपास 56 अपशब्द वापरले-नितीन गडकरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2019 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...