• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • LIVE VIDEO : दिल्लीत CAA विरोधात जामियाच्या निदर्शनांदरम्यान तरुणाने काढलं पिस्तुल; एक जखमी

LIVE VIDEO : दिल्लीत CAA विरोधात जामियाच्या निदर्शनांदरम्यान तरुणाने काढलं पिस्तुल; एक जखमी

जामिया नगरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना एका युवकानं गोळीबार केल्याचा VIDEO समोर आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 जानेवारी : जामिया नगरमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना एका युवकानं गोळीबार केल्याचा VIDEO समोर आला आहे. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जामिया नगरची ही निदर्शनं हिंसक झाली आहेत. जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी CAA विरोधात निदर्शनं केली. त्यांचा जामिया ते राजघाट मोर्चा काढण्याचा बेत होता. या मोर्चादरम्यानच जमाव हिंसक झाला. एका तरुणाने हातात पिस्तुल धरत घोषणाबाजी केली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात बंदोबस्त वाढवला आहे. पिस्तुलधारी निदर्शकाबद्दल पोलीस तपास करत आहेत. दरम्यान जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शांततामय मार्गाने चाललेल्या मोर्चाला हिंसक वळण कसं लागलं याचा तपास होत आहे. पिस्तुल काढून फायरिंग करणाऱ्या युवकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. News18 Hindi ने दिलेल्या माहितीनुसार, पिस्तुल दाखवणारा तो युवक 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम' घोषणा देत होता. 'हिंदुस्तान में रहना होगा वंदे मातरम कहना होता' अशाही घोषणा तो देत होता. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचा विद्यार्थी शादाब गोळीबारात जखमी झाला आहे. (ही बातमी अपडेट होत आहे.)
  Published by:Arundhati Ranade Joshi
  First published: