मराठी बातम्या /बातम्या /देश /

Delhi Jama Mashjid : दिल्लीच्या जामा मशिदीत मुलींना एकट्याने प्रवेशास बंदी, नवा वाद पेटणार?

Delhi Jama Mashjid : दिल्लीच्या जामा मशिदीत मुलींना एकट्याने प्रवेशास बंदी, नवा वाद पेटणार?

दिल्लीतल्या जामा मशिदीत मुलींना एकट्याने येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जामा मशीद ही देशातल्या जुन्या आणि मोठ्या मशिदींपैकी एक आहे.

दिल्लीतल्या जामा मशिदीत मुलींना एकट्याने येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जामा मशीद ही देशातल्या जुन्या आणि मोठ्या मशिदींपैकी एक आहे.

दिल्लीतल्या जामा मशिदीत मुलींना एकट्याने येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जामा मशीद ही देशातल्या जुन्या आणि मोठ्या मशिदींपैकी एक आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : एकीकडे महिलांना समाजात समान दर्जा मिळतो, निर्णयस्वातंत्र्य मिळतं; मात्र दुसरीकडे काही ठिकाणी स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो. याआधीही देशात अशा घटना घडल्या आहेत. आता दिल्लीतल्या जामा मशिदीत मुलींना एकट्याने येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जामा मशीद ही देशातल्या जुन्या आणि मोठ्या मशिदींपैकी एक आहे. त्यामुळे मशीद व्यवस्थापनानं घेतलेल्या निर्णयावर टीका होत आहे.

दिल्लीच्या जामा मशिदीनं नुकतीच एक सूचना मशिदीच्या गेटवर लावली. या सूचनेनुसार आता मशिदीत मुलींना एकट्यानं येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मशीद व्यवस्थापनानं तशी सूचना मशिदीच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर लावली आहे. जामा मशीद व्यवस्थापनाच्या या निर्णयावर समाजातून टीका केली जात आहे. देशात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं दर्जा दिलेला असताना मशिदीत एकट्या मुलींना प्रवेश नाकारला जाणं ही खूप गंभीर गोष्ट आहे, असे विचार व्यक्त केले जात आहेत.

हे ही वाचा : बापरे बाप! सर्पदंश झालेली व्यक्ती रुग्णालयात येताच सर्वांना फुटला घाम; उपचाराऐवजी सुरू झाली पळापळ

दरम्यान, जामा मशिदीत टिकटॉक व्हिडिओ शूट करणारी काही मुलं-मुली अनेकदा आढळली आहेत. तसंच काही मुलं-मुली गैरवर्तन करतानाही आढळली आहेत. त्यामुळे असा निर्णय घेतल्याचं जामा मशिदीचे इमाम अब्दुल्ला बुखारींचे प्रतिनिधी म्हणून मशीद व्यवस्थापनाचे जनसंपर्क अधिकारी सबीउल्लाह खान यांनी सांगितलं आहे.

जगभरात इस्लाम धर्मातल्या स्त्रियांचा जाचक धार्मिक रूढींविरोधात संघर्ष सुरु असताना भारतासारख्या लोकशाही व सर्वधर्मसमभाव असलेल्या देशात हे घडावं ही चिंतेची गोष्ट आहे. इराणमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून महिलांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. आता दिल्लीतील जामा मशिदीच्या आदेशावरून अनेक महिलांनी व्यवस्थापनावर टीका केली आहे.

जामा मशिदीत याआधी टिकटॉक व्हिडिओ बनवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मशीद व्यवस्थापनानं आता मुलींच्या एकट्यानं प्रवेशाला बंदी केली आहे. याचा अर्थ कुटुंबीयांसोबत मुली मशिदीत येऊ शकतील; मात्र मशीद व्यवस्थापनाने त्याबद्दचा कोणताही खुलासा केला नाहीये.

हे ही वाचा : OMG! सूर्यावर दिसला चक्क फिरता साप: VIDEO पाहून शास्त्रज्ञही झाले हैराण

दिल्लीमध्ये असलेल्या जामा मशिदीला ऐतिहासिक वारसा असल्यानं अनेक पर्यटक मशिदीला रोज भेट देतात. त्यात अनेक महाविद्यालयीन मुलींचे समूहही असतात. आता मशीद व्यवस्थापनाने असा आदेश दिल्यानं पर्यटकांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. मशीद व्यवस्थापनानं हा आदेश तिथे चित्रित होणारे गैर व्हिडिओ टाळण्यासाठी दिलेला असला, तरी त्याबाबत स्पष्ट खुलासा केलेला नाही. कोणत्याही धार्मिक स्थळी बागेप्रमाणे भेटणं, टिकटॉक व्हिडिओ बनवणं, डान्स करणं हे गैर आहे; मात्र त्यासाठी असे आदेश देणं कितपत योग्य आहे, याबद्दल चर्चा होत आहे.

First published:

Tags: Delhi, Delhi News, Delhi Police