Home /News /national /

मुंबईपेक्षा या शहरात कोरोनाचा सर्वाधिक कहर; चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

मुंबईपेक्षा या शहरात कोरोनाचा सर्वाधिक कहर; चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर

आतापर्यंत देशातील 2,71,696 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शिवाय रिकवरी रेटही 57.43 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे.

    मुंबई, 25 जून : आतापर्यंत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र नव्या आकडेवारीवरुन आता मुंबईपेक्षा दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या जलद गतीने वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 70 हजार 390 पर्यंत पोहोचली आहे. ज्यामध्ये 2365 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 41 हजार 437 लोक बरे झाले आहेत. दिल्लीत 26 हजार 588 Active cases आहेत. तर मुंबईत एकूण रुग्णसंख्या 69 हजार 528 इतकी आहे. ज्यामध्ये 3964 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 28 हजार 548 Active cases आहेत. हे वाचा-देशात कोरोनाच्या विक्रमी वाढीनंतर आली दिलासादायक बातमी; वाचा सविस्तर रिपोर्ट मुंबईत मृत्यूदर आणि Active cases जास्त  आहेत. दिल्लीत दररोज 18000 कोरोना चाचणी केली जाते. मुंबईत मात्र चाचण्या मर्यादित करण्यात आल्या आहेत. काहींच्या मते म्हणूनच दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. हे वाचा-नगरसेवक असावा तर असा! पावसामुळे रस्ताभर पाणी; मॅनहोलमध्ये उतरुन केली स्वच्छता दिल्लीपेक्षा मुंबईत सर्वाधित कंटेन्मेंट झोन 22 जूनपर्यंत मुंबईत 831 हॉटस्पॉट होते, तर दिल्लीत ही संख्या 263 इतकी आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दुसरीकडे दिल्लीत 2 मार्च तर मुंबईत 11 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. देशभरात कोरोनाचा रिकवरी रेट 57.43 पर्यंत पोहोचला असून यावरुन कोरोना आटोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांत 13,012 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत देशातील 2,71,696 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शिवाय रिकवरी रेटही 57.43 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. रिकवरी रेट वाढत असता तरी कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे समोर येत आहे.   संपादन - मीनल गांगुर्डे

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    First published:

    Tags: #Mumbai, Corona virus in india, Delhi

    पुढील बातम्या