Home /News /national /

धक्कादायक! फाटलेल्या पासपोर्टवरून पतीचं फुटलं बिंग, पत्नी झाली नाराज

धक्कादायक! फाटलेल्या पासपोर्टवरून पतीचं फुटलं बिंग, पत्नी झाली नाराज

फाटलेल्या पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा समोर आला आणि पत्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

    नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : आयजीआय केटी-3 विमानतळावरुन पत्नीसोबत दुबईला निघालेल्या एका व्यावसायिकाचं बिंग फुटलं आहे. फाटलेल्या पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा समोर आला आणि पत्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. व्यवसायिक पती आपल्या पत्नीला घेऊन दुबईला निघाला असताना चेकिंगदरम्यान हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण आणि कसं फुटलं बिंग व्यावसायिक आपल्या पत्नीसोबत विमानतळावर दुबईला जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी इमिग्रेशन अधिकारी त्यांचा पासपोर्ट तपासून पाहात होते. या पासपोर्टमधील दोन पान फाटलेली दिसली. या प्रकरणी चौकशी देखील करण्यात आली. मात्र पतीनं मला माहीत नाही अशी उडवा उडवीची उत्तर पत्नीसमोर दिली. त्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना बाजूला घेऊन मी सगळं सांगतो फक्त पत्नीसमोर नको असा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नीने तिथे तांडव सुरू केला. जी चौकशी करायची आहे आणि जे सांगायचं ते माझ्यासमोर सांगा. मी बाहेर जाणार नाही अशा आवेगात पत्नीने तिथे गोंधळ सुरू केला. चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्यावसायिक असलेला हा पत्नी याआधी दोन वेळा पत्नीसोबत खोटं बोलून थायलंड टूरवर गेला होता. एकदा बनारस थायलंड आणि दुसऱ्यांदा कोलकाताहून थायलँडला गेल्याचं देखील चौकशीदरम्यान उघड झालं आणि पतीचं बिंग फुटलं. हे वाचा-Winter Tips : गरम पाण्याने आंघोळ करताय? थंडीत तुम्ही या 10 चूका कधीही करू नका या संपूर्ण प्रकरणानंतर पत्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तिने पतीसोबत दुबईला जाण्यास देखील नकार दिला. पत्नीला आपण कुठे गेलो हे समजू नये यासाठी पतीनं पासपोर्टची पान फाडली होती. मात्र त्याचा डाव त्याच्यावरच उटलटा. पासपोर्टसोबत छेडछाड केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यवसायिक दोनवेळा थायलंडला का गेला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Delhi, Delhi latest news

    पुढील बातम्या