Home /News /national /

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांनी जारी केलं मेडिकल बुलेटीन

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांनी जारी केलं मेडिकल बुलेटीन

हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या दोन दिवस आधीच त्यांनी पक्षातल्या नेत्यांशी राजस्थानमधलं राजकीय संकट, कोविडची स्थिती यावर चर्चा केली होती.

    नवी दिल्ली 31 जुलै: काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सोनिया गांधी यांना गुरुवारी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटचे संचालक डी. एस राणा यांनी मेडिकल बुलेटीन जारी करत प्रकृतीची माहिती दिली. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आणि सुधारत असल्याचं त्यांनी सांगितलं. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायच्या दोन दिवस आधीच त्यांनी पक्षातल्या नेत्यांशी राजस्थानमधलं राजकीय संकट, कोविडची स्थिती यावर चर्चा केली होती. राज्यसभेतल्या नवनिर्वाचित खासदारांसोबतही त्यांनी चर्चा केली होती. सोनिया गांधी यांच्या सोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाची सूत्र हाती घ्यावी अशी मागणी केली होती. त्यात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि महाराष्ट्रातले नेते राजीव सातव आघाडीवर होते. 73 वर्षांच्या सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणामुळेच पक्षाध्यक्षपद सोडलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं. नंतर लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सपाटून पराभव झाल्यामुळे निकालानंतर राहुल गांधी यांनी पद सोडलं होतं. काही दिवस कुणाकडेच पक्षाची धुरा नव्हती. नंतर सर्व नेत्यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांना पक्षाची धुरा हाती घेण्याचा आग्रह केला होता. त्यानंतर भरकटलेल्या पक्षाचा वारू सावरण्यासाठी  सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाची धुरा आपल्या हाती घेतली होती. मात्र त्यानंतर पक्षात जुने आणि नवे असा ंसंघर्ष सुरू झाला. राहुल गांधी यांच्या जवळच्या अनेक नेत्यांनी बंडखोरी करत भाजपचा रस्ता धरला होता.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sonia gandhi

    पुढील बातम्या