नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात (National Herald Case) कनिष्ठ न्यायालयात सुरू असलेली सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) ताज्या निर्णयानं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत भर पडली आहे. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी या विषयावर कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे
कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय काय?
यापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात सादर केलेल्या प्रमुख साक्षिदारांच्या आधारावर सोनिया गांधी, राहुल गांधी तसंच अन्य व्यक्तींवर खटला चालवण्यास नकार दिला होता. आता उच्च न्यायालयाचे न्या. सुरेश कैत यांनी या प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी, एआयसीसीचे सरचिटणीस ऑस्कर फर्नांडीस, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया (YI) यांना 12 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
National Herald Case: Delhi High Court issues notice to Congress leader Sonia Gandhi & Rahul Gandhi on BJP MP Subramanian Swamy's plea challenging trial court order regarding summoning of various documents & witnesses. Matter slated to be next heard on 12th April. pic.twitter.com/qo96oU9Fsq
— ANI (@ANI) February 22, 2021
काय आहे आरोप?
सुब्रमण्यम स्वामी यांचे वकील सत्या सभरवाल तसंच गांधी परिवार व अन्य व्यक्तींचे वकील तरन्नूम चिमा यांनी उच्च न्यायालयाकडून नोटीस बजावल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची सुनावणी 12 एप्रिलपर्यंत स्थगित झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
( वाचा : गुलाम नबी आझादांसाठी भाजपनं अंथरलं ‘रेड कार्पेट’, वाचा काय प्रकार आहे... )
स्वामी यांनी कनिष्ठ न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत सोनिया आणि राहुल गांधींसह अन्य व्यक्तीवर फसवणूक करणं आणि अयोग्य मार्गाने पैसा कमावण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात एकूण सात जणांवर आरोप करण्यात आले आहेत. या सातही जणांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Delhi high court, Rahul gandhi, Sonia gandhi