Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /देश /

उपोषणाला बसलेल्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

उपोषणाला बसलेल्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत.

नवी दिल्ली, 18 जून : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे तीन मंत्री गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्या मागण्यांसाठी लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या कार्यालयात ठिय्या मांडून बसले आहेत. आणि या उपोषणादरम्यान आपचे दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे.

8 दिवसापासून सत्येंद्र जैन यांचं उपोषण सुरू आहे. सत्येंद्र जैन यांना डॉक्टरांकडून तात्काळ आरोग्यसेवा पुरवण्यात आली आहे. काल मध्यरात्री त्यांना रुग्णालयात दाखल केलं. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या ऑफिसात अरविंद केजरीवाल, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन आणि गोपाल राय अशा अन्य मंत्र्यांसोबत घरणे आंदोलन सुरू आहे.

केजरीवालांच्या मदतीसाठी ममतादीदी-कुमारस्वामींसह 4 मुख्यमंत्री आले धावून !

दरम्यान काल अरविंद केजरीवाल यांच्याशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून बातचीत केली. दिल्ली राज्याला अधिक स्वायत्तता देण्याच्या विषयावर केजरीवालांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंनीही पाठिंबा दर्शवल्याचं बोललं जातं आहे.

दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि नायाब राज्यपाल अनिल बैजल यांच्यात सुरू झालेला वाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दारी पोहोचला आहे. आम आदमी पार्टीच्यावतीनं पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. रविवारी संध्याकाळी मंडी हाऊसपासून या मार्चाला सुरूवात झाली होती, मात्र परवानगी न घेतल्यानं पोलिसांनी हा मोर्चा पार्लमेंट रोडवरच रोखला.

दिल्लीचा छोटा प्रश्न सुटत नाही, तर देशाचे कसे सोडवणार?

या मोर्चात आपच्या कार्यकर्त्यांसह तृणमुल काँग्रेस, माकप, भाकपचे नेते सहभागी झाले होते. दरम्यान या आधीच केजरीवालांच्या मोर्चाला ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू, कुमारस्वामी आणि पिनराई विजयन या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला होता.

दरम्यान, दिल्लीमध्ये आयएएस अधिकारी दिर्घ काळापासून संपावर असल्यामुळे कामावर परिणाम होत असल्याचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आरोप आयएएस अधिकाऱ्यांच्या संघटनेनं फेटाळलाय. आयएएस संघटनेनं पत्रकार परिषद घेत अधिकारी संपावर नसल्याचं स्पष्ट केलंय.

सर्व अधिकारी काम करत आहेत. इतकंच नव्हे तर सुट्टीच्या दिवशीही आम्ही काम करत असल्याचा दावा संघटनेनं केला आहे. मुख्य सचिवांवरील हल्ल्यानंतर अधिकारी घाबरले आहेत. राजकीय कारणांमुळे आम्हाला 'टार्गेट' केलं जात असल्याचा आरोप देखील या अधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा...

दिल्ली 'आप'चा मोर्चा : केजरीवाल म्हणतात अधिकारी संपावर, अधिकारी म्हणतात आम्ही कामावर!

गौरी लंकेश हत्या प्रकरण : मास्टर माईंडची ओळख पटली?

'डॉ.दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा तपास केव्हा लागणार'?

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यानं अनुष्काला काय दिलं प्रत्युत्तर?

'असले' जीवघेणे स्टंटस् करू नका!

First published:

Tags: AAP, Anil baijal, Arvind kejriwal, Health minister, New delhi, PM narendra modi, Politics, Satyendra Jain, Strike, अधिकारी, अनिल बैजल, अरविंद केजरीवाल, आप, आयएएस अधिकारी, नवी दिल्ली, संप