मराठी बातम्या /बातम्या /देश /Oxygen : महाराष्ट्र, मध्य प्रदेशला मागणीपेक्षा जास्त अन् दिल्लीला कमी का? हायकोर्टाची केंद्राला विचारणा

Oxygen : महाराष्ट्र, मध्य प्रदेशला मागणीपेक्षा जास्त अन् दिल्लीला कमी का? हायकोर्टाची केंद्राला विचारणा

केंद्र सरकार आणि दिल्लीमधील आपचं सरकारही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकार आणि दिल्लीमधील आपचं सरकारही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

केंद्र सरकार आणि दिल्लीमधील आपचं सरकारही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली, 29 एप्रिल : ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून दिल्ली हायकोर्टानं (Delhi high court) पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे (central government) विचारणा केली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला मागणीपेक्षा अधिक ऑक्सिजन देण्यात आला. पण दिल्लीला मात्र मागणी केली तेवढा ऑक्सिजन पुरवठा (Oxygen supply) वाढवण्यात आला नाही. यामागचं कारण काय अशी विचारणा दिल्ली हायकोर्टानं केंद्राकडे केली आहे.

(वाचा-Covaxin सुद्धा झाली स्वस्त; Bharat Biotech ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये गंभीर संकट निर्माण झालं आहे. दिल्लीमध्ये ऑक्सिजन पुरवठा आणि कोरोना महामारीसंबंधी अनेक याचिकांवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं केंद्र सरकारला विचारणा केली आहे. दिल्लीमध्ये वाढती रुग्णसंख्या पाहता ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र केंद्राकडून पुरवठाल वाढवण्यात आला नाही. उलट महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यांना मागणीच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. यामागच्या कारणाची विचारणा कोर्टानं केंद्राकडं केली आहे.

(वाचा-चहा पिताना ऑक्सिजन कशाला सुरू, पुणे मनपा अधिकारी रोज वाचवताहेत 7 टन ऑक्सिजन)

केंद्र सरकारनं आता या मुद्दयावर लक्ष केंद्रीत करून योग्य ती व्यवस्था करावी असं कोर्टानं म्हटलं आहे. सरकार या मुद्द्यावर कोर्टाला उत्तर देऊन महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला अधिक ऑक्सिजन का दिला हे स्पष्ट करेल असं सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी म्हटलं आहे. तसंच काही राज्यांना मागणीपेक्षा कमी ऑक्सिजन मिळाला आहे पण आम्ही सर्वांना पुरवठ्याचा प्रयत्न करत आहोत असंही ते म्हणाले.

केंद्र सरकार आणि दिल्लीमधील आपचं सरकारही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्सिजन पुरवठ्याच्या मुद्द्यावरूनही केंद्र आणि राज्यात तूतू मैमै सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. आता कोर्टाच्या निदर्शनास ही बाब याचिकेच्या माध्यमातून आणून देण्यात आली आहे. त्यामुळं आता कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर या परिस्थितीत नेमका काय बदल होणार हे पाहावं लागले.

First published:

Tags: Delhi, Oxygen supply