मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाचा उद्रेक; 'या' ठिकाणी बार, रेस्टॉरंट बंद तर खासगी कार्यालयांना Work From Home चे सरकारचे आदेश

कोरोनाचा उद्रेक; 'या' ठिकाणी बार, रेस्टॉरंट बंद तर खासगी कार्यालयांना Work From Home चे सरकारचे आदेश

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भव लक्षात घेता दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Sunil Desale

नवी दिल्ली, 11 जानेवारी : देशाची राजधानी दिल्लीत कोरोना (Coronavirus in Delhi) बाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होतना दिसत आहे. दिल्लीत दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या 20 हजारांवर पोहोचत आहे. दिल्लीतील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू (Night Curfew) आणि वीकेंड लॉकडाऊन (Weekend Lockdown) लागू करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. त्याच दरम्यान डीडीएमएची आज एक बैठक झाली. या बैठकीत खासगी कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्क फ्रॉम होमचे आदेश

दिल्लीतील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अर्थात डीडीएमएची (Delhi Disaster Management Authority) आज बैठक पार पडली. या बैठकीतनंतर दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद करण्याचा निर्णय गेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्याचे आदेश धेण्यात आले आहे. सध्या दिल्लीतील 50 टक्के कर्मचारी क्षमतेने कार्यालये सुरू होती आणि 50 टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत होते.

रेस्टॉरंट आणि बार बंद

पण आता सूट देण्यात आलेल्या काही ठराविक खासगी कार्यालये वगळता इतर सर्व कार्यालये बंद राहतील. या कार्यालयाचंचे कर्मचारी घरूनच काम करतील. त्यासोबतच दिल्लीतील सर्व रेस्टॉरंट आणि बारही बंद करण्याचा निर्णय गेतला आहे. रेस्टॉरंटमधून केवळ अन्न पदार्थांची होम डिलिव्हरी आणि टेकवे सेवा सुरू असणार आहे.

वाचा : लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण,ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

सोमवारी दिल्लीत एकूण 19166 कोरोना बाधित आढळून आले. त्याच दरम्यान 14076 जणांनी कोरोनावर मात केली. तर 17 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दिल्लीत आताप्रयंत एकूण 16,68,896 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 14,77,913 रुग्णांनी कोरनावर मात केली आहे. तर 25,177 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिल्लीतील मृत्यू दरात घसरण होऊन 1.60 टक्के इतका झाला आहे.

दिल्लीत कोरनाचा संसर्ग दर सोमवारी वाढून 25 टक्क्यांवर पोहोचला आहे म्हणजेच दिल्लीत कोविड चाचणी करण्यात आलेला प्रत्येक चौथ्या व्यक्तीचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या वाढून 66 हजारांवर पोहोचली आहे.

मुंबईत काय स्थिती?

मुंबईत सोमवारी (10 जानेवारी) कोरोनाचे 13648 नवे रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली आहे. मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्यामुळे निर्बंध लागले आहे. तीन दिवसांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या 20 हजारांच्या पुढे पोहोचली होती. पण सोमवारी रुग्णसंख्या कमी झाली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये 13648 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. 13648 रुग्णांपैकी फक्त 798 रूग्णांना रग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे मुंबईत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर २४ तासात २७२१४ रुग्ण बरे झाले आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ८७ टक्के आहे.

First published:

Tags: Coronavirus, Delhi