नवी दिल्ली 9 जून: दिल्ली सरकाने मोठा निर्णय घेतलाय. दारुवर लावलेला 70% Corona Tax संपविण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल वाढिसाठी सरकारने 4 मे रोजी कोरोना टॅक्स लावला होता. MRPच्या किंमतीवर सरकारने 70% टॅक्स लावला होता. तर या बदल्यात VAT 20 टक्क्यांवरून 25 टक्के एवढा केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ताप आणि इतर लक्षणं दिसत असल्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतःला क्वांरंटाइन करून घेतलं होतं. त्यांची सकाळी COVID-19 चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आता आला असून केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी नकारात्मक आली आहे. केजरीवाल यांना ताप आणि खोकला असल्याने कोरोना चाचणी झाली होती.
दिल्लीतील कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे प्रेस इन्फरमेशन ब्युरोचे महासंचालक आणि केंद्र सरकारचे मुख्य प्रवक्त्यांनाही कोरोनाचा लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय माध्यम केंद्र आगामी 2 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासनाला युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.
मंत्रालयात दिवसभरात फक्त 20 कर्मचारी राहू शकतात उपस्थित, केंद्र सरकारचा नवा आदेश
दिल्लीत गेल्या दोन-तीन दिवसात Coronavirus ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रुग्णांना सामावून घ्यायला पुरेशी रुग्णालयं आहेत का असा प्रश्न निर्माण झाल्यावर केजरीवालांनी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये दिल्लीकरांना प्राधान्याने उपचार मिळतील. परप्रांतीयांनी दिल्लीत उपचारासाठी येऊ नये असा आदेश काढला. त्यावरून मोठा वादंग उठला होता. अखेर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी केजरावाल यांना हा आदेश मागे घ्यायला लावला.
हे वाचा -
अखेर भारतासमोर झुकला चीन, LACवरून 2.5 किमी सैन्य बोलावलं माघारी!
घाबरू नका! देशातील सर्वात वयोवृद्धानेही 45 दिवसांच्या लढाईनंतर कोरोनाला हरवलं