ऐतिहासिक! सलग सहाव्या वर्षी दिल्लीकरांना मिळणार स्वस्त वीज

ऐतिहासिक! सलग सहाव्या वर्षी दिल्लीकरांना मिळणार स्वस्त वीज

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी सलग सहाव्या वर्षी दिल्लीतील वीजदर न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आप सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी सलग सहाव्या वर्षी दिल्लीतील वीजदर न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आप सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दिल्ली वीज नियामक मंडळाने (DERC) ने कोरोना व्हायरसच्या संकटकाळात (Coronavirus) वीजदर न वाढण्याच्या निर्णयाची 28 ऑगस्ट रोजी घोषणा केली. यासंदर्भात अरविंद केजरीवाल यांनी देखील ट्वीट करत दिल्लीकरांचे अभिनंदन केले आहे.

केजरीवाल त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत की, 'दिल्लीतील जनतेचे अभिनंदन, एकीकडे संपूर्ण देशामध्ये दरवर्षी वीजदर वाढत आहेत. मात्र दिल्लीमध्ये सलग सहाव्या वर्षी वीजदर वाढले नाहीत तर काही ठिकाणी दर कमी केले आहेत. हे ऐतिहासिक आहे, आणि हे याकरता होत आहे कारण दिल्लीमध्ये तुम्ही एक इमानदार सरकार बनवले आहे.'

(हे वाचा-10 तास PPE किट घालून ड्यूटी केल्यानंतर अशी होते डॉक्टरांची अवस्था,पाहा PHOTOS)

डीईआरसीने असे म्हटले आहे की, कोरोना व्हायरस महामारीमुळे वीज वितरण कंपन्यांच्या महसुलातील वाढीसाठी टेरिफमध्ये मार्चसाठी कोणताही बदल होणार नाही आहे. यामध्ये बीएसईएस राजधानी पावर लिमिटेड (BRPL), बीएसएनएल यमुना पावर लिमिटेड (BYPL), टाटा पावर दिल्ली डिस्ट्रिब्यूशन लिमिटेड (TPDDL) आणि नवी दिल्ली नगरपालिका परिषद (NDNC) यांचा समावेश आहे.

(हे वाचा-सोन्याच्या दरात मोठी घसरण, सरकार देत आहे 5117 रुपयात सोनेखरेदीची संधी)

2013 मध्ये अरविंद केजरीवाल यांनी वाढणाऱ्या वीजदराविरोधात अनिश्चित काळासाठी उपोषण (बिजली-पानी सत्याग्रह) केले होते. यावेळी त्यांनी दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर आप सरकारने टेरिफ 50 टक्क्यांनी कमी केले आहे. दरम्यान AAP च्या अधिकृत ट्विटर अकाऊंट देखील याबाबत ट्वीट करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे.

अन्य राज्यांमध्ये प्रति यूनिट वीजदर पुढीलप्रमाणे आहेत- गुजरातमध्ये 100 यूनिट पर्यंत 3.5 रुपये आणि 101-200 यूनिटसाठी 4.15 रुपये, पंजाबमध्ये 100 यूनिटपर्यंत 4.49 रुपये आणि 101- 202 यूनिटसाठी 6.34 रुपये, गोव्यात 100 यूनिटपर्यंत 1.5 रुपये आणि 101-200 यूनिटसाठी 2.25 रुपये आहे. दरम्यान दिल्लीमध्ये प्रति यूनिट वीजदर 200 यूनिटपर्यंतच्या वापरासाठी 0 टक्के तर 201 ते 400 यूनिटच्या वापरासाठी 50 टक्के सबसिडी दिली जाते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 30, 2020, 1:12 PM IST

ताज्या बातम्या